AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray : एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिरांचा बंडखोरांना थेट इशारा

एकेकाळी जे मंत्री होण्यासाठी रडत होते, पाय धरत होते ते आज विचारतायेत आदित्य ठाकरे कोण? मात्र तुम्हाला आत्ता सांगतो आदित्य ठाकरे हा एक दिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका सचिन आहिर यांच्याकडून करण्यात आली.

Aditya Thackeray : एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिरांचा बंडखोरांना थेट इशारा
एक दिवस आदित्य ठाकरे तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिरांचा बंडखोरांना थेट इशाराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2022 | 8:18 PM
Share

पुणे : गेल्या एक महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला. मातोश्रीवर रोज नेत्यांच्या ही बैठका पार पडतायेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्वतः मैदानात उतरत महाराष्ट्र पैंजण काढायला सुरुवात केली आहे अलीकडेच आदित्य ठाकरे यांचा कोकण आणि मराठवाडा दौरा पार पडलाय. या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता आदित्य ठाकरेंचा पुणे दौरा सुरू आहे. आदित्य ठाकरेंचे पुणे दौऱ्यात भाषण करताना सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांवर तूफान टीका केलीय. एकेकाळी जे मंत्री होण्यासाठी रडत होते, पाय धरत होते ते आज विचारतायेत आदित्य ठाकरे कोण? मात्र तुम्हाला आत्ता सांगतो आदित्य ठाकरे हा एक दिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका सचिन आहिर यांच्याकडून करण्यात आली.

शाहाजी बापू पाटलांनीही जोरादर इशारा

तसेच पुण्यातले शिवसेना नेते रघुनाथ कुचिक हे पुन्हा बॅक इन ॲक्शन मोडमध्ये आलेत. यावेळी टीका करताना सचिन आहिर म्हणाले, पुरंदर तालुक्यातील झोपे गेलेला एकजण जागा झाला. तर त्यांनी पुरंदर मध्ये आज शहाजी बापू पाटलांच्या भाषणाचाही समाचार घेतला आहे. बापू तुमचं वागणं बरं नाही. ज्या ताटात जेवला त्याच ताटात मिठाचा खडा टाकला. जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा भाषेत त्यांनी शहाजी पाटलांनाही इशारा दिलाय.

नड्डांनी येऊन पाहवं शिवसेना कुठे संपलीय का?

तसेच जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रात येऊन पहावं शिवसेना संपली आहे का? ही गर्दी पाहून ठरवावं असं थेट आव्हान त्यांनी जेपी नड्डांना त्यांनी दिलं. दोन दिवसांपूर्वीच घराणेशाहीच्या पार्ट्या संपत आल्या आहेत, असे म्हणत जे पी नड्डांनी शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या डिवचलं होतं. ट

आदित्य ठाकरे सुरूवातीपासूनच आक्रमक मोडवर

तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हेही बंडखोरांना रोज गद्दार आहेत. तुमच्या दम असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरा. त्यावेळेस तुम्हाला कळेल शिवसेना कुणाची आहे असे थेट आव्हान देत आहेत. त्यावरूनच आता बंडखोर आमदार आदित्य ठाकरे यांना तशाच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत, त्यामुळे हा सामना अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. हा वाद दिवसेंदिवस शिगेला पोहचताना राज्यातली जनात पाहत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.