Sharad Pawar | 83 व्या वर्षी आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांना काय वाटलं? मध्यरात्री कोणासोबत बोलले?
Sharad Pawar | केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा पुढचा प्रवास सोपा झाला आहे. तेच शरद पवारांना नव्याने सर्व पट मांडावा लागणार आहे.
Sharad Pawar | महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय नेते शरद पवार यांना काल धक्का बसला. वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार यांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यांच्यासमोर खूप मोठ चॅलेंज आहे. घरातली सदस्यानेच त्यांच्यावर मात केली. शरद पवार यांनी ज्यांना घडवलं, त्या अजित पवारांकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला आहे. नात्याने शरद पवार-अजित पवार काका-पुतणे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा पुढचा प्रवास सोपा झाला आहे. तेच शरद पवारांना नव्याने सर्व पट मांडावा लागणार आहे. आज दुपारपर्यंत त्यांना नवीन गटासाठी नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला कळवाव लागणार आहे. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनात असे अनेक धक्के पचवले आहेत, असे अनेक धक्के दिले सुद्धा आहेत. पण आता उतारवयात त्यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर शरद पवार यांनी रात्री उशिरा पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. “या निर्णयाची कल्पना होती. शिवसेनेचा निकाल पाहता काय होईल, याची जाणीव होती. माघार घ्यायची नाही, मोठ्या ताकदीने पुढे जायचा निर्धार पवारांनी बोलून दाखवला” अशी माहिती सूत्रांनी दिली. “शरद पवार यांची लढण्याची मानसिकता आहे. पुढची बाजू ते सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत” असं सूत्रांनी सांगितलं.
शरद पवार गटाची पुढची राजकीय खेळी काय?
शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल? त्या बाबत कळवाव लागणार आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ हे नाव नव्या पक्षाच असू शकतं. त्याचवेळी ‘उगवता सूर्य’ या चिन्हासाठी पवार गट अर्ज करु शकतो. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ यात सीनियर पवारांच नाव आहे. त्याचा मोठा राजकीय लाभ होईल असं पवार गटातील नेत्यांना वाटतं.