‘एमआयएम’नंतर आता राष्ट्रवादीचा शिवसेनेलाही धक्का; सोलापुरातील हा बडा नेता ‘घड्याळ’ बांधणार

महेश कोठे  सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत. | Mahesh Kothe may join NCP soon

'एमआयएम'नंतर आता राष्ट्रवादीचा शिवसेनेलाही धक्का; सोलापुरातील हा बडा नेता 'घड्याळ' बांधणार
महेश कोठे
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 9:24 AM

सोलापूर: ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार पाडल्यानंतर आता सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) शिवसेनेलाच धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे (Shivsena) विरोधी पक्षनेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांनाच गळाला लावल्याची चर्चा आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता सोलापुरातही अहमदनगरच्या ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती दर्शविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नगरसेवकांना घरवापसीचा सल्ला दिला होता.

मात्र, सोलापुरात महेश कोठे बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याने तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. महेश कोठे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग केला आहे. हे पद त्यांनी आपले विश्वासू सहकारी अमोल शिंदे यांच्याकडे सोपवले आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग केल्यानंतर महेश कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याचे समजते. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, त्यामुळे सोलापुरात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. महेश कोठे यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास ती शिवसेनेसाठी मोठी नामुष्की ठरेल.

सध्या सोलापूर महागनरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे चार नगरसेवक आहेत. मात्र, ‘एमआयएम’च्या तौफिक शेख आणि शिवसेनेच्या महेश कोठे यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद प्रचंड वाढेल, अशी चर्चा आहे.

कोण आहेत महेश कोठे?

  • महेश कोठे  सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत
  • आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक
  • सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव
  • 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली.
  • 2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.
  • महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा

राष्ट्रवादीने पाडले ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सुगीचे दिवस आले आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत आता नित्यनियमाने इनकमिंग सुरु आहेत. यामध्ये आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख (Taufik Shaikh) यांची भार पडली आहे. (MIM leader Taufik Shaikh will join NCP soon)

गेल्या काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापुरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

सोलापूर महानगरपालिकेतील ‘एमआयएम’चे सर्व नगसेवक गळाला?

सोलापूर महानगरपालिकेतील दहापैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून थेट शून्य होणार आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेत मी नाराज पण राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या तथ्यहीन : महेश कोठे

सोलापुरात राजकीय भूकंप होणार?, शिवसेनेच्या महेश कोठेंसह MIM चे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर

काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी एमआयएम नगरसेवकला अटक

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.