Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashatra Politics : राजकीय महाभूकंपाचा असाही फायदा! हा पक्ष ठरेल दुसरा सर्वात मोठा

Maharashatra Politics : राज्यातील राजकीय महाभूंकपाचा या पक्षाला मोठा फायदा झाला. राज्यात चार प्रमुख पक्षातील दोन मोठ्या पक्षातील उभी फूट या पक्षाच्या पथ्यावर पडली. आपसूकच हा पक्ष राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

Maharashatra Politics : राजकीय महाभूकंपाचा असाही फायदा! हा पक्ष ठरेल दुसरा सर्वात मोठा
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 6:38 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रात 2 जुलै 2023 हा राजकीय घडामोडींसाठी सुपर संडे ठरला. राज्यात एक वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. जनतेला राजकीय धक्क्याची सवय झाली असली तरी असे काही होईल, हे त्यांच्या गावी नव्हते. पण राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणतात. तसेच घडले. मोठा उलटफेर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (NCP) अजित पवार यांनी शिवसेना-भाजपशी घरोबा केला. सध्याच्या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी तिसरा घटक झाला. त्यांनी लागलीच राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर दावा पण सांगितला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ तर इतर 8 जणांना लागलीच मंत्री पदाची लॉटरी लागली. राज्यातील राजकीय महाभूंकपाचा या पक्षाला मोठा फायदा झाला. राज्यात चार प्रमुख पक्षातील दोन मोठ्या पक्षातील उभी फूट या पक्षाच्या पथ्यावर पडली. आपसूकच हा पक्ष राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष (Second Largest Party) ठरला.

महाविकास आघाडी कोलमडली राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. तिचे सरकार पण आले. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बाहेर पडत आघाडीवर पहिला धक्का दिला. त्यानंतर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे समीकरण होते. आता अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील आमदार तिसरा घटक झाले. त्यामुळे महाविकास आघाडी कोलमडली आहे.

दोन पक्षात उभी फूट शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लोकसभेतील बहुतांश खासदारांसह राज्यातील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. उद्धव ठाकरे गट अल्पमतात आला. तर आता ही अजित पवार हे राष्ट्रवादीतील मोठा गट त्यांच्या सोबत असल्याचा दावा करत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे. या घाडमोडींचा या पक्षाला मोठा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

सध्याची विधानसभेची स्थिती काय राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. अजित पवार एनडीएचे घटक नसल्याचे गृहित धरले तर सध्या विधानसभेत पक्षीय बलाबल असे समोर येते. यामध्ये भाजपकडे सध्या सर्वाधिक 105, त्यानंतर शिवसेना-40, शिवसेना उद्धव ठाकरे गट – 16, राष्ट्रवादी काँग्रेस- 53, काँग्रेसकडे 45 आणि इतर 29 आमदार आहेत.

राष्ट्रवादीतील दावे-प्रतिदावे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी संपूर्ण पक्ष, चिन्हावर दावा सांगितला. वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, सध्या पक्षातील 30 आमदार त्यांच्या पाठीशी आहेत. तर इतर जण काही तासातच त्यांना पाठिंबा देतील. राष्ट्रवादीचे सध्या एकूण 53 आमदार आहेत. त्यातील 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत असतील तर शरद पवार यांच्याकडे सध्या 23 आमदार उरतील.

काँग्रेस दुसरा मोठा पक्ष या घडामोडीनंतर काँग्रेसकडे सर्वाधिक 45 आमदार असतील. भाजप 105 आमदारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे राज्यात भाजपनंतर काँग्रेस ही सर्वात मोठी पार्टी असेल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना असेल. सध्या सत्ताधारी शिवसेनेचे 40 आमदार आहेत.

परिषदेसह लोकसभेचे चित्र विधान परिषदेतील किती आमदार आणि खासदार अजित पवार यांच्यासोबत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल, असा दावा केला.

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.