संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात, बीडमध्ये भाजपविरोधात घोषणाबाजी

राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बंजारा समाजातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये बंजारा समाजातील काही लोक आणि राठोड यांचे समर्थक एकत्र आले आणि त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात, बीडमध्ये भाजपविरोधात घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 6:00 PM

बीड : पूजा चव्हाण प्रकरणात अखेर 20 दिवसानंतर वनमंत्री संजय राठोड यांची विकेट पडली आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आपण राजीनामा दिल्याचं संजय राठोड यांनी म्हटलंय. मात्र, राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बंजारा समाजातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये बंजारा समाजातील काही लोक आणि राठोड यांचे समर्थक एकत्र आले आणि त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.(After the resignation of Sanjay Rathod, the Banjara community is aggressive)

राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बंजारा समाजातील नागरिक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाचं खापर बंजारा समाजातील लोकांनी आणि राठोड समर्थकांनी भाजपवर फोडलं आहे. येणाऱ्या काळात भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराच बंजारा समाजातील राठोड समर्थकांनी दिला आहे. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाचे कार्यकर्ते आणि राठोड यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप नेत्यांमुळेच बंजारा समाजाचील नेतृत्वाला राजीनामा देण्याची वेळ आल्याचा आरोप राठोड समर्थकांनी केला आहे.

उद्रेक झाल्यास भाजप जबाबदार, महंतांचा इशारा

संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण तत्पूर्वी पोहरादेवी गडाच्या महंतांनी एक इशारा दिलाय. राजकीय दबाव टाकून राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला गेल्यास बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल. उद्या या असंतोषाचं उद्रेकात रुपांतर झालं तर त्याला भाजपच जबाबदार राहील, असा इशारा महंत सुनील महाराज त्यांनी दिला आहे. चौकशी न होताच राजीनामा घेण्याचा चुकीचा पायंडा पडू नये, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ड्राफ्ट तयार, मुख्यमंत्र्यांना पाठवणार

यावेळी सुनील महाराज यांनी आम्ही एक ड्राफ्ट तयार केला आहे. या ड्राफ्टमध्ये राठोड यांचा राजीनामा न घेण्याची विनंती केली आहे. हा ड्राफ्ट ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक

After the resignation of Sanjay Rathod, the Banjara community is aggressive

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.