Jahangirpuri Encrochment : अतिक्रमण हटवताना दिल्लीतल्या जहांगिरपुरीत भेदाभेद? मशिदीसमोरच्या अतिक्रमणावरही बुलडोजर
Jahangirpuri Encrochment : जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) हनुमान जयंतीला हिंसाचार (Violence) झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझरची कारवाई केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर मात्र यादरम्यान कारवाई सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाईला स्थगिती देत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर येथील स्थिती वेगळीच झाली आहे. तर अतिक्रमण […]
Jahangirpuri Encrochment : जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) हनुमान जयंतीला हिंसाचार (Violence) झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझरची कारवाई केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर मात्र यादरम्यान कारवाई सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाईला स्थगिती देत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर येथील स्थिती वेगळीच झाली आहे. तर अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या बुलडोझरची कारवाई मशिदीसमोरच्या अतिक्रमणावर ही हातोडा चालविण्यात आला आहे. यानंतर मात्र आता मंदिर-मशीद वाद पेटण्याचे चित्र आहे. कारण जे कारण सांगूण मशिदीसमोरच्या अतिक्रमणावर ही हातोडा चालविण्यात आला तेच कारण येथील मंदिरावर लागू होत नसल्याचेच दिसून येत आहे. तर या मंदिरावर कोणी आक्षेप घेऊ नये त्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तेथे लावण्यात आला होता.
मंदिर-मशीद वाद पेटण्याचे चित्र
जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीला हिंसाचार झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरची कारवाई केली. यावेळी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. तर थेट कारवाई करण्यात आली. यामुळे ज्यांची घरे-दुकाने होती त्यांनी या कारवाईला विरोध केला. ज्यांनी विरोध केला त्यांची धरपकड झाली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत मशीद ही सोडण्यात आली नाही. येथील मशीदीसमोरील भाग आणि त्याचे गेट तोडण्यात आले. यानंतर आता मंदिर-मशीद वाद पेटण्याचे चित्र आहे. कारण एकाच लाईनमध्ये मंदिर-मशीद असताना फक्त मशीदवर कारवाई का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
मंदिराला छावणीचे स्वरूप
जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंती ज्या मशीदीजवळ हिंसाचार झाला. त्या मशीदीवर प्रशासनाने अतिक्रमणाचे कारण सांगत कारवाईचा बडगा उगारला. मात्र याच मशीदी जवळ असणाऱ्या मंदिरावर मेहरबानी करण्यात आली. उलट तेथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांची मोठी फौज उभारण्यात आली होती. ज्यामुळे मंदिराला छावणीचे स्वरूप आले होते. मंदिराचा बाहेरील भाग हा मशीदी एवढाच बाहेर आहे. तसेच त्याचे ही बाहेर शेड आहे. असं असताना हे प्रशासनाला का दिसत नाही. फक्त मशीदीचा विषय म्हणून हातोडा का मारला जात आहे, अशी विचारणा आता होत आहे.
व्हिडीओ सध्या व्हारल
मंदिर-मशीद संदर्भार एक व्हिडीओ सध्या व्हारल होत आहे. ज्यात दिल्ली- जहांगीरपुरी में मस्जिद पर चला बुलडोजर, मंदिर को छोड़ दिया असे म्हटलं आहे. त्यातच एकाच लाईनमध्ये मंदिर-मशीद असताना फक्त मशीदवर कारवाई का असा प्रश्न आता विचारला जात आहे. तसेच याच व्हिडिओवर काही जनांनी रिप्लाय दिला आहे. त्यात म्हटलं आहे की, दुःखद! घरी जा, थोडे पाणी गरम करा आणि ते प्या. म्हणजे तुम्हाला आराम मिळेल.
शौकत ए सिद्दीकी याने म्हटले आहे की, उघड्या डोळ्यांनी जेव्हा भेद केला जातो. तेव्हा त्रास हा होतो. हि खेदाची गोष्ट आहे.
तर अबू सहमा… या प्रकरणा विषयी लिहितीत, या प्रकरणाला का फिरवत आहात? मंदिर-मशिदीत सगळे अडकत आहेत. असेच चालत राहिलो तर माणुसकीच संपून जाईल. लोकांनी असेच लिहावे असे चुड्डीगँगला वाटते. जेणेकरून त्या लोकांना पुन्हा संधी मिळेल. हे कटू आहे पण खरे आहे. या कारवाईने आपल्या देशाचे राष्ट्रपिता यांना ही सोडले नाही. त्यामुळे आणखी याबद्दल बोलणे चांगले नाही.
दिल्ली- जहांगीरपुरी में मस्जिद पर चला बुलडोजर, मंदिर को छोड़ दिया pic.twitter.com/MRZvdwSB79
— Anmol Pritam (@anmolpritamND) April 20, 2022