आदर्श गाव हिवरे बाजारच्या उपसरपंचपदी पोपटराव पवार, सरपंच कोण?

पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलचा ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय झाला. (Hivrebajar Sarpanch Election Popatrao Pawar)

आदर्श गाव हिवरे बाजारच्या उपसरपंचपदी पोपटराव पवार, सरपंच कोण?
हिवरेबाजार ग्राम पंचायत
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 9:13 AM

अहमदनगर : अहमदनगरमधील आदर्श गाव हिवरे बाजार (Hivrebajar) येथील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सरपंचपदी विमल दिपक ठाणगे, तर उपसरपंचपदी पोपटराव भागुजी पवार यांची निवड झाली. (Ahmednagar Hivrebajar Gram Panchayat Sarpanch Election Popatrao Pawar)

विशेष म्हणजे या दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. रोहिदास नामदेव पादीर यांनी दोघांच्या नावाची सूचना जारी केली. त्याला ग्रामपंचायत सदस्य विठल भाऊ ठाणगे, रोहिदास नामदेव पादीर, रंजना राजू पवार, मीना संदीप गुंजाळ, सुरेखा बना पादीर या सदस्यांनी पाठिंबा दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोपटराव पवारांच्या पॅनलचा दणदणीत विजय

पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलचा ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय झाला. पोपटराव पवार यांच्या पॅनलने विरोधकांचा जोरदार पराभव केला. हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या पॅनलला 7 तर विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे हिवरेबाजार ग्रामपंचायतींवर पुन्हा एकदा पोपटराव पवार यांचं वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळत आहेत.

पोपटरावांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास

हिवरेबाजारमध्ये 1989 पासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यंदा मात्र हिवरेबाजारमध्ये बिनविरोध निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यामुळे गेल्या 30 वर्षांची परंपरा यंदा खंडीत झाली होती. पण पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलला विजय मिळाल्यानं हिवरे बाजारमधील ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवल्याचंच पाहायला मिळत आहे.

“ज्या हाताने गाव उभं केलं. त्याच गावाने मताच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे हे महत्त्वाचं. गाव सांभाळणारे हात आणि गाव मजबूत करणारे हात गावकऱ्यांनी मजबूत केले, हेच या निकालातून स्पष्ट होतंय,” अशी प्रतिक्रिया पोपटराव पवार यांनी विजयानंतर व्यक्त केली होती.

1989 पासूनची परंपरा खंडीत

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असून सातही जागांसाठी निवडणूक पार पडली. पण पोपटराव पवार यांनी केलेला हिवरेबाजारचा विकास आणि देशभरात पोहोचवलेलं गावाचं नाव यामुळे ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या हाती पुन्हा एकदा सत्ता दिली आहे.

संबंधित बातम्या :

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम, आदर्श ग्राम पॅनलचा दणदणीत विजय

(Ahmednagar Hivrebajar Gram Panchayat Sarpanch Election Popatrao Pawar)

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.