अहमदनगर महापालिकेत ट्विस्ट, सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेचा शड्डू

राज्यात महाविकास आघाडी असली तरी अहमदनगरला शिवसेना-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात असल्याचं दिसत आहे. (Ahmednagar Standing Committee Shivsena Vs NCP)

अहमदनगर महापालिकेत ट्विस्ट, सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेचा शड्डू
राष्ट्रवादी Vs शिवसेना
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 2:12 PM

अहमदनगर : अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात शिवसेना उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. (Ahmednagar Municipal Corporation Standing Committee Speaker Election Shivsena Vs NCP)

अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. घुलेंच्या विरोधात शिवसेनेच्या विजय पठारे यांनी अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता ही निवडणूक पार पडणार आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात

विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडी असली तरी अहमदनगरला शिवसेना-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ऐनवेळी शिवसेना किंवा राष्ट्रवादीपैकी कोणी माघार घेणार की निवडणूक होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे मनोज कोतकर सभापती झाले होते. त्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. आता या निवडणुकीत कोणते समीकरण पाहायला मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे.

गेल्या वर्षी काय घडलं होतं?

स्थायी समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला होता. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे दावेदार मानले जाणाऱ्या मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. इतकंच नाही, तर सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णीही लागली. भाजपवासी असतानाही मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. (Ahmednagar Municipal Corporation Standing Committee Speaker Election Shivsena Vs NCP)

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही याबाबत चर्चा घडवून नगर मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम दिला.

नाशिकमध्ये मनसेची भाजपला टाळी

नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे (MNS) टाळी देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला (BJP) मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खबरदारी घेताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धास्तीने नाशकात भाजपची मनसेला टाळी

(Ahmednagar Municipal Corporation Standing Committee Speaker Election Shivsena Vs NCP)

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.