AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, पत्रकारांना चहाला न्या; चंद्रशेखर बावनकुळे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Chandrashekhar Bawankule Audio Clip Viral : पत्रकारांना ढाब्यावर जेवू घाला, चहाला न्या; निवडणुकी आधी भाजपच्या वरिष्ठांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिल्याची चर्चा. चंद्रशेखर बावनकुळे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...

आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, पत्रकारांना चहाला न्या; चंद्रशेखर बावनकुळे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Chandrashekhar Bawankule
| Updated on: Sep 25, 2023 | 1:35 PM
Share

अहमदनगर | 25 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. अशात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ही कथित ऑडिओ क्लिप आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ही ऑडिओ क्लीप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचनेची ऑडिओ क्लिप असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, tv9 मराठी या ऑडीओ क्लिपची पुष्टी करत नाही.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लिप चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचं बोललं जात आहे. 2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, अशी तजवीज करा. यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना धाब्यावरही घेऊन जा. जेवू घाला. आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत. हे बोलणारी व्यक्ती बावनकुळे असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी अहमदनगरमधील सावेडीतील माऊली सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी या बैठकीत बावनकुळे यांनी चर्चा केली. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी पार पाडायच्या जबाबदाऱ्या यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीतील हे वक्तव्य असल्याचं बोललं जात आहे.

ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं, आपल्या पक्षाचं चांगलं काम पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. काही यूट्यूब चॅनेलवाल्यांनी, पोर्टलवाल्यांनी चुकीच्या बातम्या चालवल्या. लोकांपर्यंत चांगलं काम गेलं पाहिजे. हाच आमचा हेतू होता, असं बावनकुळे म्हणालेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.