Asaduddin Owaisi on jahangirpuri violence : जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर कारवाईवर असदुद्दीन ओवेसी भडकले; म्हणाले, भाजपने गरीबांविरुद्ध युद्ध पुकारले
नवी दिल्ली : हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात अचानक हिंसाचार झाला, त्यात अनेक लोक जखमी झाले, यादरम्यान एका पोलिसालाही गोळी लागली. या प्रकरणी आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, तर एनएसए अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिंसाचारानंतर सरकारकडून कडक कारवाई केली जात आहे. आता अवैध अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा […]
नवी दिल्ली : हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात अचानक हिंसाचार झाला, त्यात अनेक लोक जखमी झाले, यादरम्यान एका पोलिसालाही गोळी लागली. या प्रकरणी आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, तर एनएसए अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिंसाचारानंतर सरकारकडून कडक कारवाई केली जात आहे. आता अवैध अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या भागातील अवैध धंदे हटवण्यासाठी येथे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर अवैध धंदे हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईचा संदर्भ देत एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रशासनाच्या या कारवाईबाबत त्यांनी सोशल मीडियावर ट्विटही केले आहे. यावरून ओवेसी यांनी भाजप (BJP) आणि दिल्ली सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच त्यांनी या कारवाईचा संदर्भ देत, भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असे म्हटले आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हिंसाचारानंतर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावर त्यांनी ट्विट करत, भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. असे म्हटले आहे. तसेच अवैध धंदे हटवण्याच्या नावाखाली हे लोक यूपी, एमपी प्रमाणे दिल्लीतही लोकांची घरे तोडत आहेत. या लोकांना नोटीसही देण्यात आलेली नाही. त्या गरिबांना कोर्टात जाण्याची संधीही दिली नाही. गरीब मुस्लिमांना शिक्षा होत आहे. कारण त्यांनी जगण्याचे धाडस दाखवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ओवेसी यांनी म्हटलं आहे.
Supreme Court must stop this injustice.#StopBulldozingMuslimHouses https://t.co/zmvqMbpCS5
— Kaushik Raj (@kaushikrj6) April 19, 2022
यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे पीडब्ल्यूडीही या मोहिमेचा एक भाग आहे का, असा सवालही ओवेसी यांनी केला. जहांगीरपुरीच्या जनतेने त्यांना मतदान केले नाही का? ही कृती त्या लोकांचा विश्वासघात नाही का? हा भ्याडपणा नाही का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत पोलिस आमच्या पाठीशी नाहीत असे म्हणत राहतात, ही सबब आता चालणार नाही. तुम्ही नैतिकता आणि कायदेशीरपणाचा आव आणत आहात. ही अत्यंत निराशाजनक स्थिती असल्याचेही ओवेसी म्हणाले.
Is his govt’s PWD part of this “demolition drive”? Did people of Jahingirpuri vote for him for such betrayals & cowardice?! His frequent refrain “police is not in our control” won’t work here
There isn’t even a pretence of legality or morality anymore
Hopeless situation 2/2
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 19, 2022