AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही दिल्लीत बसून करा," अशी आक्रमक प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी (Imtiyaz Jaleel Oppose guidelines for Bakra Eid) दिली.

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक
| Updated on: Jul 23, 2020 | 1:03 AM
Share

औरंगाबाद : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा बकरी ईदनिमित्ताने गर्दी टाळण्यासाठी गृहविभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमावलीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली. “सर्व नियम आम्हालाच आणि तुम्हाला मात्र सूट हे चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिल्लीत बसून करावा,” अशी आक्रमक प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली. (Imtiyaz Jaleel Oppose Maharashtra government’s guidelines for Bakra Eid)

“आम्ही प्रतिकात्मक ईद साजरी करणार नाही. शासनाचे परिपत्रक आम्ही पाळणार नाही. सगळे नियम आम्हाला आणि तुम्हाला मात्र सूट हे चालणार नाही. गर्दी टाळण्यासाठी सरकारने काही निर्देश केले आहेत. मात्र हे नियम पंतप्रधान मोदी यांना लागू होत नाहीत का? त्यांनीही येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिल्ली बसून प्रतिकात्मकरित्या साजरा करावा,” अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“ऑनलाईन पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री ज्यांना शक्य आहे ते करतील. पण ज्यांच्याकडे एक दोन जनावरं असलेल्यांनी काय करावं? नेते, अधिकारी यांच्याकडे स्मार्टफोन आहे. पण सर्वसामान्यांकडे ती सोय नाही. त्यांचा विचार कोण करणार,” असा प्रश्नही जलील यांनी सरकारला विचारला. (Imtiyaz Jaleel Oppose Maharashtra government’s guidelines for Bakra Eid)

मार्गदर्शक सुचना नेमक्या काय आहेत?

1) कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

2) सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनवरुन जनावरे खरेदी करावेत.

3) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

4) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

5) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

6) कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. (Imtiyaz Jaleel Oppose Maharashtra government’s guidelines for Bakra Eid)

संबंधित बातम्या : 

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही, कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची बकरी ईदच्या नियमावलीवर नाराजी

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.