अजित दादांना फडणवीसांचं ट्रेनिंग? मॅनेजमेंटचा गुरुमंत्र, फी घेणार की मोफत? ही काय भानगड?

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या अतिशय मुरलेल्या आणि कुणालाही न दुखावता केलेल्या वक्तव्यांतून उत्तम वाक्तचातुर्य दिसून आलंय. राजकीय वर्तुळात आज ही वक्तव्य तुफान चर्चेत आहेत.

अजित दादांना फडणवीसांचं ट्रेनिंग? मॅनेजमेंटचा गुरुमंत्र, फी घेणार की मोफत? ही काय भानगड?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 1:39 PM

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना (Ajit Pawar) भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadanvis) ट्रेनिंग. मॅनेजमेंटचा गुरुमंत्र हे ऐकून विचित्र वाटेल. पण अजितदादांनीच अशा ट्रेनिंगची मागणी केलीय. फडणवीसांनी हा गुरुमंत्र देऊ, असंही म्हटलंय आणि त्यावर फी किती घेणार, असा सवालही अजित दादांनी विचारलाय. ही वक्तव्य आलीयत, पण ती राजकीय खेचाखेचीतून. शिंदे सरकार (CM Eknath Shinde) स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. त्यातही काहींना दोन जिल्हे तर फडणवीसांचा सहा जिल्हे देण्यात आले. यावरून अजित दादांनी फडणवीसांवर खोचक टीका केली.

अजित पवार म्हणाले, पालकमंत्री असताना फक्त पुणे जिल्हा माझ्याकडे होता तर नाकी नऊ यायचं… पण फडणवीसांकडे तर सहा जिल्हे दिलेत. कसं काय जमतं यांना… मला तर पुण्याचं पालकमंत्री पद सांभाळतानाच नाकी नऊ आले…

यावर देवेंद्र फडणवीसांनीही चपखल उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ मी गुरुमंत्र देतो… कधी त्यांचं राज्य आलंच तर दोन-तीन-चार जिल्हे कसे मॅनेज करायचे हे शिकवेन….

फडणवीसांनी हे सहा जिल्हे त्यांच्याकडे का आहेत, याचंही स्पष्टीकरण दिलं. हे सहा जिल्हे नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय, त्यामुळे सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? असा सवाल फडणवीसांनी केला.

ही मुरलेली टिप्पणी ऐकाच-

यानंतर अजित पवारांनीही पुन्हा वक्तव्य केलं. ते म्हणाले, मी आता त्यांना पत्र पाठवणार आहे. ट्रेनिंगला कधी येऊ? काही फी आहे का मोफत आहे, त्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो. ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि राजकीय वर्चस्वाची जीवघेणी स्पर्धा यांमध्ये हल्ली नेत्यांनी टीकेची अगदी खालची पातळी गाठलीय. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या अतिशय मुरलेल्या आणि कुणालाही न दुखावता केलेल्या वक्तव्यांतून उत्तम वाक्तचातुर्य दिसून आलंय. राजकीय वर्तुळात आज ही वक्तव्य तुफान चर्चेत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.