शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, अजित पवारांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (7 फेब्रुवारी) राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, अजित पवारांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 5:36 PM

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (7 फेब्रुवारी) राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. शिळ्या गढीला उत आणण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात आणि अमित शाह यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन बंद खोलीत चर्चा झाल्याचं वारंवार सांगितलंय, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. अजित पवार यांनी नागपूरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध कामांची माहिती घेतली. तसेच त्यांना सूचनाही केल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करत संवाद साधला (Ajit Pawar answer Amit Shah over claim about Uddhav Thackeray promiss issue).

अजित पवार म्हणाले, “शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे त्यांच्यात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली होती. मी काही तिथे नव्हतो, मी ज्योतिषी नाही. राज्यात महाविकासआघाडी सरकार आलं तेव्हापासून सांगितलं जातंय की हे सरकार जाईल. मात्र आमच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा या सरकारला आशीर्वाद आहे. जोपर्यंत हा आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही.”

मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या, पण त्यात माझीही चूक : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “मध्ये बातम्या पण मला अशा वाचायला मिळाल्या. खरंतर यात माझीही चूक आहे. मी माझी चूक नाही असं म्हणणार नाही. माझ्याकडून काही कळण्याआधीच ‘अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं’ अशा बातम्या वाचायला मिळाल्या. वास्तविक मी प्रत्येक विभागाच्या डीपीसीच्या बैठका घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील घेतल्या. सर्वच विभागांमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे जयंत पाटील देखील अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या परीने काम केलं. मी पण माझ्या परीने काम करतो. आजही मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मिहानबद्दल अलिकडे बैठक झाली नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.”

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • राज ठाकरेंनी आरोप केले असले तरी शरद पवार सगळ्यांनाच भेटतात, त्यामुळे काहीच संबंध नाही
  • हे सरकार साखर कारखान्यांसाठी चालतंय हे सगळं चुकीचं आहे, आम्ही साखर कारखानदारांना अडचणीत कसे आणणार?
  • शेतकऱ्यांच्या हिताचं बिल असेल तरच लागू करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय
  • केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढत नाही
  • आंदोलन ठिकाणी खिळे ठोकले, सुप्रिया सुळेंसारख्या नेत्यांना तिथे जाण्यापासून थांबवली, त्यात वेगवेगळ्या पक्षाचे खासदार होते
  • केंद्र सरकारची नेहमी शेतकरी विरोधी भूमिका असते

हेही वाचा :

मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या, पण त्यात माझीही चूक : अजित पवार

‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असलं काही करु नका, अजितदादांचा मोलाचा सल्ला

इंदापुरात अजितदादा म्हणाले, तर समोरच्याचं डिपॉजिट जप्त झालं असतं !

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar answer Amit Shah over claim about Uddhav Thackeray promise issue

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.