काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष आहे (Ajit Pawar on current politics).

काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 10:52 AM

सातारा : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार काय बोलतात याकडे अनेकांच लक्ष आहे (Ajit Pawar comment on current political situation). मात्र, अद्याप या दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड होत आहे. याला अजित पवारही उपस्थित आहेत. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी सध्या मी काही बोलणार नाही, बैठक झाल्यावरच बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी बैठक होत आहे. यावेळी शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडीशिवाय अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या सातारा वैद्यकीय महाविद्यालय प्रश्न, प्रलंबित पाणी प्रश्न आणि इतर काही प्रलंबित प्रश्न आहेत. यावर अजित पवार ही बैठक झाल्यावर बोलणार आहेत. या बैठकीला सुप्रिया सुळे येणार की नाही यावर मला माहीत नाही असं उत्तर त्यांनी दिलं. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, “या प्रकरणी देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी भूमिका मांडली आहे. ये योग्य नाही. मुद्देसूद टीका करावी. व्यक्तिगत पातळीवर टीका नको.”

रयत शिक्षण संस्थेची ही बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार सातारा सर्किट हाऊसला येत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर 3 वर्षांनी होते. आतापर्यंत कर्मवीर पुण्यतिथी म्हणजेच 9 मे रोजी ही निवड पार पडत होती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड पुढे ढकलण्यात आली. या सभेला कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या सभेत संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी निवड होईल. त्यानंतर 2 सहसचिवांचीही निवड होईल. मात्र, शरद पवार हे आजीवन अध्यक्ष आणि अनिल पाटील हे कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळं उर्वरित पदांचीच निवड होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष आहे. या बैठकीसाठी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे देखील सर्किट हाऊसला पोहोचले आहेत. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवारांचीही भेट घेतली. या भेटीनंतर शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “पवार साहेब आणि अजित पवार यांना निवेदन दिलंय. सातारा एमआयडीसीमधील समस्या, बजाज यांनी घेतलेल्या जमिनीत उद्योग सुरु करावा अन्यथा ही जमीन एमआयडीसीकडे द्यावी, येथे कोविड सेंटर सुरु करावं. सातारा जिल्हा बँकेला देवस्थानच्या जमिनीवर पीक कर्ज देण्यास अडचणी आल्या आहेत. जावळी तालुक्यातील शेतकरी यांना पीक कर्ज मिळत नाही. कोणतीही राजकीय चर्चा नाही. दादा विकास काम करताना राजकारण बघत नाही.”

मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार

दरम्यान, भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं म्हटलं होतं (Sharad Pawar on Gopichand Padalkar). त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केलं. या सर्व प्रकरणात खुद्द शरद पवार यांची भूमिका काय आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे. शरद पवार याबाबत पुण्यात भाष्य करतात का, याकडे माध्यमांचं लक्ष होतं. मात्र, शरद पवारांनी “मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन”, असं म्हटलं आहे (Sharad Pawar on Gopichand Padalkar).

पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला (Sharad Pawar on Pune Corona Situation).

हेही वाचा :

मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन : शरद पवार

आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस

आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात…

Ajit Pawar comment on current political situation

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.