Video | ‘मला ते करुन पाहिजे…’ अधिकाऱ्याला अजित पवारांनी सगळ्यांदेखत फोनवरुनच झापलं

आतापर्यंत अजित पवारांनी त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेकदा अधिका-यांना खडसावलं असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे त्यांनी एखाद्या अधिका-याला खडसावल्यानंतर त्याची राजकीय चर्चा अधिक होते. तसेच त्यांची अधिका-यांकडून काम करून घ्यायची पध्दत वेगळी असल्याने त्यांच्याकडून अनेकदा अधिका-यांना जाब विचारल्याचं पाहायला मिळतं

Video | 'मला ते करुन पाहिजे...' अधिकाऱ्याला अजित पवारांनी सगळ्यांदेखत फोनवरुनच झापलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 11:23 AM

मुंबई – उपमुख्यमंत्री हे त्यांच्या डॅशिंग कृतीमुळे अधिक चर्चेत असतात नुकतेच त्यांनी एका अधिका-याला काम का झाले नाही, तसेच ते का होत नाही असं सगळ्यांसमोर फोन लावून चांगलेचं झापल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यात (pune) अनेक कार्यकर्त्यांची तक्रारी आल्याने अजित पवारांनी (ajit pawar) थेट अधिका-यांना सर्वांनसमोर फोन लावला. त्यावेळी त्यांनी त्या अधिका-याला जाब विचारल झापल्याची चर्चा आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला असून अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तो स्टेटसला देखील ठेवला आहे. त्यामुळे अजित पवारांची पुन्हा एकदा पुण्यात चर्चा सुरू झाली. पुणे महापालिकेच्या तोंडावर अजित पवारांनी अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या समस्या देखील ते जाणून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारी काम अडकल्याने कार्यकर्ते निराश

पुण्यात महापालिकेच्या पाश्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी आपली कंबर कसायला सुरूवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेत आपली सत्ता असावी अशा अनेक पक्षांनी तिथल्या नेत्यांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिथल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या तोंडावर अजित पवारांनी मागच्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी भेट द्यायला सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या कानावर काम झाले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांनी चक्क एका अधिका-याला फोन लावला ते काम का नाही केलं असा जाब विचारला. तसेच ज्या अधिका-यांनी ते काम केल नसेल त्याला त्याला करायला सांगा अशी सुचना देखील दिली. तसेच मला ते करून पाहिजे असं देखील अजित पवार व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

अजित पवारांनी आत्तापर्यंत अनेकदा अधिका-यांना झापले आहे

आतापर्यंत अजित पवारांनी त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेकदा अधिका-यांना खडसावलं असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे त्यांनी एखाद्या अधिका-याला खडसावल्यानंतर त्याची राजकीय चर्चा अधिक होते. तसेच त्यांची अधिका-यांकडून काम करून घ्यायची पध्दत वेगळी असल्याने त्यांच्याकडून अनेकदा अधिका-यांना जाब विचारल्याचं पाहायला मिळतं.

Modi In Pune Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल! पुणे मेट्रोसह वेगवेगळ्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

IND vs SL, 1st Test, Day 3, LIVE Score: सबुकछ रवींद्र जाडेजा, श्रीलंकेचा डाव 174 धावात आटोपला

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...