भाजप गाजर दाखवतंय, तरीही खडसे, जयसिंग गायकवाडांसारखी माणसं आमच्याकडे : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टोलेबाजी केली.

भाजप गाजर दाखवतंय, तरीही खडसे, जयसिंग गायकवाडांसारखी माणसं आमच्याकडे : अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 4:22 PM

नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टोलेबाजी केली. “कार्यकर्ते कुठे जाऊ नये म्हणून भाजप आपल्या कार्यकर्त्यांना गाजर दाखवण्याचं काम करत आहे. तरीही एकनाथ खडसे, जयसिंग गायकवाड यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते आमच्याकडे आले,” असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पांडुरंगाचा प्रसाद घेऊन मी संतांच्या भूमी असलेल्या मराठवाड्यात आल्याचं सांगत आघाडीचे उमेदवार सतिष चव्हाण यांचा विजय नेतृवाच्या उंचीला साजेसा असा करा, असं आवाहनही केलं (Ajit Pawar criticize BJP over claims of Government change in Maharashtra).

अजित पवार म्हणाले, “आमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असूनही आम्ही एकत्र आलो. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका सांगितली आहे. वर्षपूर्ती निमित्ताने सरकारची वर्षभरातील कामं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यक्रम करायचे आहेत. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करुन घेण्यासाठी मेहनतीनं काम करा. दिवस कमी राहिलेत, त्यामुळे पाचही जागी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. आपण पक्षातील कार्यकर्ते, नेते जो निर्णय घेतील त्यानुसार आपण काम करायचं आहे.”

“कोरोनामुळे 9 महिने वाया गेले. दुसरी कोरोनाची लाट येऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे. नांदेडकर कोरोना विसरले की काय असं वाटण्याइतकी गर्दी झालीय. परंतू प्रत्येकांने काळजी घ्यावी. दुसऱ्याला दिलेला घास त्याच्या तोंडातून न काढता कसा मार्ग काढायचा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही सर्व समाजासाठी प्रयत्नशील आहोत. कुठलंही आरक्षण घेताना दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत तेढ निर्माण करू नका, अशी माझी हाथ जोडून विनंती आहे,” असंही ते म्हणाले.

“केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गांची कामं रखडली, 28 हजार 700 कोटी जीएसटीही बाकी”

यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्यातील महामार्गांच्या कामावर होणाऱ्या दुर्लक्षावरही भाष्य केलं. तसेच राज्याच्या हक्काच्या जीएसटीचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली आहेत. केंद्राकडे 28 हजार 700 कोटी बाकी आहे. राज्याचे हे हक्काचे पैसे का दिले नाही? 12 हजार कोटी पगारांवर खर्च होत आहेत. निसर्ग चक्री वादळात मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत दिली. परतीच्या पावसात मोठे नुकसान झाले. एसटीला देखील आम्ही पॅकेज दिले.”

यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेलाही उत्तर दिलं. हे बावचळ्यासारखे बोलत आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात भाजपचे नेते कुणाबद्दलही काहीही बोलतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

“लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं

आषाढी वारीची महापूजा करण्याचा योग कधी? पंढरपुरात अजित पवारांचं भन्नाट उत्तर

पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, 35 दिवसांनंतर बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar criticize BJP over claims of Government change in Maharashtra

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.