Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले.
अहमदनगर : अतिवृष्टीमुळे (Heavy rain) मोठे नुकसान झाले आहे. रोप वाया गेली. पेरण्या झाल्या मात्र जास्त पावसामुळे ते वाया गेले. अॅक्शन घेणे गरजेचे आहे काही शेतकरी म्हणाले अजून आमच्याकडे कोणी आले नाही. किमान पालकमंत्री तरी नेमावे, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचीदेखील त्यांनी पाहणी केली. सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पालकमंत्रीही नेमले गेले पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे बरोबर नाही, अशी टीका त्यांनी केली.
‘अनेकांना शब्द दिले आहेत, ते पाळण्याची भीती वाटत असेल’
मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे अनेकांना शब्द दिले आहेत. ते पाळले जातील की नाही, अशी शंका त्यांना वाटत असेल, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. लोकशाही जर मजबूत करायची असेल तर तातडीने त्यांनी सहकाऱ्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे अजित पवार म्हणाले.
‘तातडीने पंचनामे झाले पाहिजेत’
राज्यात पुराचे संकट रौद्र रूप धारण करत आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागत आहे. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पंचनामे झाले पाहिजेत. वेळ निघून गेली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली. तर नामांतराच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली. माझे सरकार आल्यानंतर संभाजीनगर करणार, असे ते म्हणाले होते. मग त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याते कारण काय, असा सवाल करत काँग्रेस-राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी होती. मात्र विकासाच्या बाबत एक मत होते, असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?