Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात
अजित पवार, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:01 AM

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी पहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे. राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे पत्र प्राप्त झाले, त्यातून लक्षात येते की त्यांना आपण सत्तेत होतो, याचे विस्मरण झाले आहे. गजनीसारखी त्यांची अवस्था झाल्याचं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

आज कोणत्या विषयांवर चर्चा

आजपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावरून विरोधक सुरुवातीपासूनच सरकारवर टीका करत आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करू शकतात.

हे सुद्धा वाचा

तयारी साठी कमी वेळ

दरम्यान दुसरीकडे मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने मंत्री विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोनच दिवसांपूर्वीच खाते वाटप जाहीर झाल्यामुळे मंत्र्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला असल्याची शक्यता  कमी आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.