आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती; अजित पवारांनी शिंदे गटाची चांगलीच खरडपट्टी काढली
यांचेच आमदार गोळ्या उडवतात. यांना सत्तेची मस्ती, धुंदी आणि नशा आली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हात पाय तोडण्याची शिकवण देत आहेत.
जळगाव : दसरा मेळावा शीवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरु आहे. या वादात आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील उडी घेतली आहे. शिंदे गटाची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. चून चून के मारेंगे या शब्दात शिंदे गटाचे संजय गायवाड यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना इशारा दिला होता. त्यांच्या टीकेला अजित पवारांनी( Ajit Pawar) आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांवर निशाणा साधला आहे.
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जवाबदारी आपल्या मुलाला दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्या देखील बाजूला केले. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती असं म्हणत दसरा मेळाव्याचा घाट घालण्याच्या प्रयत्नात असेलल्या शिंदे गटावर दादांनी टीका केली आहे.
यांचेच आमदार गोळ्या उडवतात. यांना सत्तेची मस्ती, धुंदी आणि नशा आली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हात पाय तोडण्याची शिकवण देत आहेत. काय बापाची ठेव आहे काय? बुलढण्याचे आमदार म्हणतात शिंदे विराधात बोललात तर चुन चुन कें मारेंगे. मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाहीत. एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणून पालकमंत्री नियुक्त होत नाहीत.
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याची घोषणा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीं त्यावेळी सभागृहात केली होती. शिंदे सरकार कोणाच्या दबावाखाली आहे का? छत्रपती यांनी शिकवलं कुणापुढे झुकायच नाही. इथे तर झुकायला सुरुवात झाली आहे.
भाजपाला शेटजी भटजी चा पक्ष म्हणायचे. मुंडे, खडसे, डांगे यांनी पक्ष तळागाळात पोहोचवला. खडसेंवर अन्याय होत असल्याने साहेबांनी त्यांना बरोबर घेतलं. पवार साहेबांची एकच भूमिका आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा विचार समाजापुढे ठेवतात.