Video : अजितदादांनी भरसभेत कोणाला हात जोडले? इंदापूर तालक्यातील सभेमध्ये नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या भाषणाने व सडेतोड बोलण्याने तसेच कार्यकरर्ते संभाळण्या बाबतीत किती पक्के असतात हे अनेकदा दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यात वरकुटे खुर्द येथे सभेत भाषण करीत असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या भाषणाने व सडेतोड बोलण्याने तसेच कार्यकरर्ते संभाळण्या बाबतीत किती पक्के असतात हे अनेकदा दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यात वरकुटे खुर्द येथे सभेत भाषण करीत असताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इंदापूरचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांचा उल्लेख करत त्यांचे पुत्र ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील यांचा खरतर आज वाढदिवस आहे असे म्हणत मला ही बाब माहिती नव्हती. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मला हे सांगितले असे म्हणत आणा रे तो माझा बुके ,आणा म्हणजे माझ्या स्वागतला मला दिलेला बुके आणा असेल म्हणत सभा थांबवुन बुके देऊन प्रतापराव पाटील यांना अजित पवारांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आज आणखी कुणाचा वाढदिवस असेल त्यांनाही हात जोडून अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या ज्यांचा कोणाचा आज वाढदिवस असेल त्यांना देखील शुभेच्छा नाहीतर म्हणतील हा बाबा फक्त त्यांना शुभेच्छा देतो, असं काही नाही मला माहिती नव्हतं ज्यांचा ज्यांचा आज वाढदिवस असेल त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपले वेगळेपण दाखवून दिलेय.
अजित पवारांनी हात कुणाला जोडले
अजित पवार हे काल इंदापूरमधील वरकुटे खुर्द येथील एका गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सभेत बोलताना अजित पवार यांनी इंदापूरचे माजी आमदार गणपतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस असल्याचं सांगत त्यांचा सत्कार केला. अजित पवार यांनी त्यांच्या स्वागतासाठी आणलेलाच बुके सत्कारासाठी आग्रहानं मागून घेतला. प्रतापराव पाटील यांचा सत्कार केल्यावर अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांसमोर हात जोडले. सभेत उपस्थित असणाऱ्या कुणाचा वाढदिवस असेल तर त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असं म्हणत अजित पवारांनी सर्वांना हात जोडले.
पाहा व्हिडीओ :
लाखेवाडीतल्या सभेत दारुड्याची एन्ट्री, अजित पवार म्हणाले माझा मुडच जातो
अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना आतापर्यंत दारुचा एक थेंबही घेतला नसल्याचं म्हटलं होतं. इंदापूर तालुक्याच्या लाखेवाडीत झालेल्या कार्यक्रमात दारुड्याने एन्ट्री केली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण थांबवत ‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही..’ असे त्याला सुनावलं. ‘तू नंतर येऊन भेट मला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. एवढंच नाही तर हे असले दादा दादा करायला लागले की माझा मूडच जातो असं सांगायलाही ते विसरले नाहीत. याआधी देखील बारामती तालुक्यातील कटफळ येथील कार्यक्रमात दारुड्याने एन्ट्री केली होती.. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनी दारु संदर्भात कारवाई करावी असे सांगितले होते..
पाहा व्हिडीओ
इतर बातम्या :
IPL 2022 SRH vs LSG Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना कधी आणि कुठे पाहता येईल?