शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजितदादांची ग्वाही

शिरुरच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शिरुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजितदादांची ग्वाही
उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतंचं उद्घाटन
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 2:57 PM

पुणे : शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकूण 25 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. शिरुरच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शिरुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते. (Ajit Pawar inaugurated the new administrative building of Shirur Municipal Council)

नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराचा विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवून शिरुरनगरीचा विकास करावा, अशी अपेक्षा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलीय.

‘नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे’

नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेवूनच प्रशासनाला सहकार्य करायला हवे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल.पुणे ते शिरुर रस्त्याचे दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारीमार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

‘शिरुर परिसर मराठवाड्याच्या नागरिकांकरीता पुणे, मुंबईचे प्रवेशद्वार होणार’

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर परिसर हे मराठवाड्याच्या नागरिकांकरीता पुणे व मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून भविष्यात ओळखले जाईल, अशी विकासकामे करण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले. तर आमदार अशोक पवार यांनी शिरुर परिसरातील पायाभूत विकास करण्यासाठी वेळोवेळी निधी प्राप्त झालेला आहे. यापुढेही विविध विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नगरपरिषद आवारात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नूतन इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाला माजी आमदार पोपटराव गावडे व रमेश थोरात, उपनगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

‘दुसरा डोस घेतल्यानंतरही नियम पाळा’

दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या :

दोन प्रभाग कधीच मागितले नाही, तीन प्रभागांचा फायदा कुणाला होतो ते पाहू; अजित पवारांचं सूचक विधान

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात लवकरच केव्हाही निवडणूक लागू शकते : आशिष शेलार

Ajit Pawar inaugurated the new administrative building of Shirur Municipal Council

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.