Ajit Pawar: ह्यात निश्चित काही काळंबेरं आहे, अजित पवारांनी शिंदेंना भाजपच्या धोक्याची आठवण करुन दिली

Ajit Pawar : 105 आमदार असताना फडणवीस उपमुख्यमंत्री अन् शिंदे मुख्यमंत्री, याच नक्कीच काही काळबेरं, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar: ह्यात निश्चित काही काळंबेरं आहे, अजित पवारांनी शिंदेंना भाजपच्या धोक्याची आठवण करुन दिली
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:12 PM

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने (BJP) एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात भाष्य केलं. “40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होतात, 106 आमदार असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री होतात, याच नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. “आमच्या 105 मुळे आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत, हे मनुष्यस्वभाव बोलायला मागे पुढे पाहणार नाही, हे लक्षात घ्या”,असं अजित पवार म्हणाले. गेल्या 8-10 दिवसांत राज्यात इतकं काही बरंच घडलं, की म्हटलं जातं की 40 आमदार उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवून गेला. त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं. आता जरा बाहेर शिवसैनिकांच्या मनात काय सुरु आहे, याची माहिती घ्या”, असंही अजितपवार म्हणाले.

“तुम्ही मंत्री होतात आणि आपल्या कार्यकर्त्याला सांगताय की मिरच्या झोंबल्या पाहिजे, अरे काय…ssss सूरतवरुन गुवाहाटी मग गोवा… माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात आतापर्यंतच्या हयातीत इतकं सगळं फिरायला मिळालं नसेल. मग आमचे शहाजीबापू.. काय झाडी… काय डोंगार… काय हॉटेल.. ओक्केयओक्केय… याच्यात फार गोंधळून जाण्याची आणि फार लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“सत्तेचा ताम्रपट कुणाकडेही नाही”

“विरोधी मतदान करुन आम्ही आमची भूमिका मांडली. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. पण देवेंद्रजी मी तुमचं भाषण बारकाईने ऐकलं, तुम्ही त्यांचं एवढं समर्थन करत होतात, मग मागच्या टर्म असतान फक्त रस्ते विकास महामंडळच त्यांच्याकडे का दिलं? नेता मोठा असला की खाती जास्त असतात, हे चंद्रकात पाटील यांना माहीत आहेत. जर शिंदे साहेब सर्वगुणसंपन्न होते, तर छोटंसं रस्ते विकास महामंडळ, ज्याचा जनतेशी संबंधच नव्हता, हायवे करायचे, टनल करायचे, असं असताना त्यांनी दुसरं कुठलं खातं का नाही दिलं? याचा महाराष्ट्रपण विचार करेल”,  असं म्हणत अजित पवारांनी सत्तेचं गणित मांडलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.