अजित पवार म्हणतात, बारामतीत कुणी गेलं की ब्रेकिंग न्यूज…
नितीन गडकरी यांनाही मी जाऊन भेटतो. हे प्रश्न आहेत, याच्यात लक्ष घाला, असं सांगतो. हे काम काही वैयक्तिक नसतं. हे राज्याचं काम असतं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या बारामतीत आल्या होत्या. यावेळी चारशेच्या वर लोकसभेचा आकडा जावा, यासाठी भाजप प्रयत्न करते. तो त्यांचा अधिकार आहे. आघाडीच्या जास्तीत-जास्त जागा निवडून याव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. बारामतीला कुणी गेले की, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. खरं तर मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटतो. त्यामागचं कारणही अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, 15 जुलैला मुख्य सचिव यांची बैठक घेतली होती. वेदांतला आणखी काही सवलती देता येतील, काय भूमिका घ्यायची. त्यात प्रमुख लोकं होते. तुम्हीही पत्रकार आहात. मलाही काही कागदपत्र मिळाली आहेत. त्यावर कुणी काही बिनबुडाचे आरोप करत असतील, तर त्याला किती महत्त्व द्यायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
केंद्रीय अर्थमंत्री नुकत्याच बारामतीला येऊन गेल्यात. त्यांच्याबद्दल मी चांगले मत मांडतो. त्यांचा आदर करतो. राज्यात मी अर्थमंत्री असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मला जेएससी कौन्सिलचे अध्यक्षपद दिलं होतं. तेव्हा आम्ही अर्थमंत्री म्हणून एकमेकांशी बोलायचो. प्रश्न सोडवायचो, असं अजित पवार यांनी सांगितलं.
मी राज्यातील प्रश्नांवर लक्ष घालतो
कोणताही प्रकल्प मंजूर करण्यासाठी दिल्लीला जायचं असतं. त्यासाठी संसदेत काम करणाऱ्या सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सक्षम आहेत. त्यात मी लक्ष घालण्याचं कारण नाही. मी राज्यातील प्रश्नांवर लक्ष घालतो.
राज्याचा, देशाचा विचार करून निर्णय
केंद्रात पाठपुरावा करायला लागायचा. तेव्हा शरद पवार यांना सांगायचो. किंवा जे कुणी प्रमुख असतील त्यांना सांगायचो. नितीन गडकरी यांनाही मी अनेकदा जाऊन भेटतो. हे प्रश्न आहेत, याच्यात लक्ष घाला.हे काम काही वैयक्तिक नसतं. हे राज्याचं काम असतं. राज्याचा फायदा व्हावा, यासाठी कोण कुठल्या पक्षाचा आहे, हे बघायचं नसतं. केंद्राचे किंवा राज्याचे मंत्री हे देशाचा किंवा राज्याचा विचार करून योग्य निर्णय घेतात.
कुठल्या जिल्ह्याच्या निवडणुका केव्हा लागतील. काही सांगता येत नाही. पालकमंत्री म्हणून काम करताना मला कार्यकर्ते, आमदार यांनी सहकार्य केलं. आढावा बैठका घेऊन व्हर्च्युअल बैठका घेण्याचं काम केलं. सभासद नोंदणी झाली का, काय चाललंय. प्रभाग तीनचा होईल की, चारचा होईल. यासंदर्भात लक्ष घालत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.