“काम करणारे पुढे या; मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा”, फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळालीय. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

काम करणारे पुढे या; मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा, फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 10:41 AM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळालीय. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातून एक दिवस बारामतीत येत असतात. या दरम्यान, विकासकामांची पाहणी, कोरोना आढावा बैठक असा त्यांचा दिनक्रम असतो. त्याचबरोबर कोरोना आणि नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त मदत आणि साहित्याचं वाटप अजित पवार यांच्या हस्ते होत असतं. आजही विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी मिरवणारे बाजूला व्हा, ज्यांनी काम केलंय, त्यांना पुढे येऊ द्या अशा शब्दात कानपिचक्या दिल्या. तर बाजूलाच स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून 5 टँकर देण्यात आले. त्यावेळीही अजित पवारांनी ज्यांनी काम केलंय त्यांनी फोटोसाठी उभे रहा आणि बाकीचे बाजूला व्हा असं आपल्या खास शैलीत सांगत समाजोपयोगी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

स्पष्टवक्ते आणि रोखठोक स्वभाव असलेले अजित पवार नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी फोटोसाठी पुढे पुढे येणाऱ्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये कानपिचक्या दिल्या. त्यामुळं फोटोसाठी नाहक पुढे पुढे करणाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय हे मात्र नक्की.

हेही वाचा :

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करा; अजितदादांचं पंतप्रधानांना पत्रं\

पुणे मेट्रोच्या उभारणीतील मार्ग मोकळा, अडथळा ठरणाऱ्या वस्त्यांवर कारवाईसाठी प्राधिकरणाला हायकोर्टाची मुभा

…आणि नात शरद पवारांना बिलगली, मिथिला पवारांच्या लग्नातील खास आठवणी

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar taunt local politician on crowd for photograph

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.