Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तो पर्यंतच शिंदे फडणवीस सरकार टिकणार; अजित पवारांनी नुसता दावाच केला नाही तर आकडेमोडही मांडली

अजित पवारांच्या बोलण्याचा सूर हाच आहे की, शिंदे-भाजप सरकार कोसळणार. गेल्या महिन्याभरापासून अजितदादा तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत.

... तो पर्यंतच शिंदे फडणवीस सरकार टिकणार; अजित पवारांनी नुसता दावाच केला नाही तर आकडेमोडही मांडली
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 11:34 PM

मुंबई : 145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार. मंत्रिपदावरुन शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळं काही काळ थांबा, सर्वच समोर येईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणालेत. योग्य वेळेची वाट पाहतोय, असं अजित पवारांचं म्हणण आहे. तर, अजित पवारांमध्येच अस्वस्थता असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, शिवसैनिकांना आवडलेलं नाही, असंही अजित पवार वारंवार सांगतायत.

अजित पवारांच्या बोलण्याचा सूर हाच आहे की, शिंदे-भाजप सरकार कोसळणार. गेल्या महिन्याभरापासून अजितदादा तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण सध्या तरी 145 प्लसचं संख्याबळ शिंदे भाजपकडे आहे.

विधानसभेच्या 288 जागा असून बहुमताचा आकडा 145 इतका आहे. शिंदें गटाकडे 40 आणि अपक्ष तसंच इतर 10 आमदारांसह 50चं संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत: 106 आमदार आणि इतर 8 असे एकूण 114 आमदार होताच. म्हणजेच शिंदे-भाजप सरकारचं संख्याबळ होते, 164 आमदाराचं.

MIMकडे 2 आमदार असून, MIMचं नं कोणालाही पाठींबा दिलेला नाही. आणि त्यामुळं महाविकास आघाडीकडे एकूण 122 आमदार आहेत पण मंत्रिपद न मिळाल्यानं, शिंदे गटातील आमदार नाराज होऊन, सरकार पडेल असं अजित पवारांना वाटतंय. महिन्याभरापासून अजित पवारांचा तोच सूर आहे.

इकडे अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही, आमदारांना दिलेल्या आश्वासनामुळंच, मंत्रिमंडळ विस्तारातही अडचण झाल्याचं म्हटलंय.

राजकारणात संख्याबळाला महत्वं असते. साडे 3 महिन्यांआधी महाविकास आघाडीकडे बहुमत होतं..पण बंडामुळं समीकरण बदललं आणि संख्याबळ शिंदे गट आणि भाजपच्या बाजूनं झुकलं. आता पुन्हा काही तरी होईल, असं अजित पवारांना वाटतंय.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.