चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अजित पवारांनी जमिनी लाटण्याचं काम केलं’, आता दादांचं थेट उत्तर

अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप पाटील यांनी केलाय. पाटील यांच्या या आरोपाला आता खुद्द अजित पवार यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. 'आपण काय बोलतो याचं भान बाळगलं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही', अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'अजित पवारांनी जमिनी लाटण्याचं काम केलं', आता दादांचं थेट उत्तर
अजित पवार, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 5:05 PM

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सातत्याने सुरु असतात. पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) तोंडावर ते अधिकच तीव्रतेने होताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप पाटील यांनी केलाय. पाटील यांच्या या आरोपाला आता खुद्द अजित पवार यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आपण काय बोलतो याचं भान बाळगलं पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही’, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.

उचलली जीभ लावली टाळ्याला, अजिदादांचं प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना, त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेत आहे. त्यांनी काही तरी पुरावे द्यावेत. मी सकाळी लवकर उठून संध्याकाळपर्यंत काम करत असतो. मंत्रालयात सकाळी 8 वाजता हजर असणारा मी एकमेव मंत्री आहे आणि उशिरापर्यंत बसून मी तिथे माझ्यापरीनं काम करत असतो. ते काम योग्य की अयोग्य हे जनता त्याठिकाणी ठरवेल. आपण काय बोलतो याचं भान बाळगणं गरजेचं आहे. हेलिकॉप्टरमधून जाताना कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते, कितीजण जाणार याची माहिती द्यावी लागते. ते मोठी व्यक्ती आहेत. पण उचलली जीभ लावली टाळ्याला असं करून चालत नाही. वास्तविक त्यांनी एकदा आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावं, की आपण काय बोलतो आणि ते वस्तुस्थितीला धरुन आहे का? असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी चंद्रकांतदादांना दिलंय.

चंद्रकांत पाटलांची नेमकी टीका काय?

चंद्रकांत पाटील पुण्यातील मांजरी या गावातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला होता. ‘अडाणी म्हाताऱ्या माणसालाही हे माहिती आहे की 6 हजार रुपये मोदी देतात. आता मग तो मत मोदींना देणार की पवारांना देणार? की ज्यांनी आयुष्यभर पैसे लोकांचे पैसे काढून घेण्याचंच काम केलं. जमिनी काढून घेण्याचं काम केलं. मला असं कळलं की मांजरीवाल्यांना काही वर्षापूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात आलं होतं. तेव्हा ते नको बोलले कारण पवार आमच्या जमिनी लाटून घेतात. म्हणून पुन्हा ते महापालिकेतून काढून घेण्यात आलं. एकदा गेले होतो महापालिकेत पण अजित पवारांची इतकी भीती की, म्हणाले आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि घेऊन जातील. ते हेलिकॉप्टरने वरुन बघतात की कुणाकुणाच्या जमिनी शिल्लक आहेत. धरणाच्या सोडत नाहीत, कशाच्याच सोडत नाहीत. त्यामुळे लोकांना हे कळतं की मोदी 6 हजार रुपये देतात, कोरोना लस देतात, गरोदर स्त्रिला 6 हजार रुपये देतात, रेशन फ्री देतात, टॉयलेट फ्री देतात, गॅस फ्री देतात’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

पुण्यातील आढावा बैठकीवरुनही पाटील-पवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

पुणे महापालिकेची निवडणूक जवळ येतील तसतसा चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येतोय. पुण्यातल्या शाळा आणि कोरोना आढावा बैठकीवरुनही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. अजित पवार बैठकीत विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तर याला राष्ट्रवादीकडून पाटलांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. अजित पवार हे विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या : 

Video : अजित पवारांना पुन्हा आठवण आली आबांची, कार्यकर्त्यांना का म्हणाले हलक्या कानाचे राहू नका?

मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी

“बुरखा-हिजाबला माझा विरोधच पण…”, कर्नाटक हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर संतापले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.