‘मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…!’ अजितदादांचा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना टोला

अजित दादा यांनी 'मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार', असं वक्तव्य केलं.

'मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय...!' अजितदादांचा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 10:07 PM

अश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 29 मे रोजी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा टोला हाणलाय. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर अजित दादा यांनी ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार’, असं वक्तव्य केलं. अजितदादांच्या या उत्तरानं तिथं उपस्थित पत्रकारांनाही हसू आवरलं नाही. अजित पवार यांनी यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला होता. (Ajit Pawar’s reply to Chandrakant Patil’s claim that government will fall)

“चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही”, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

वारीसाठी स्वतंत्र कमिटी नियुक्त

आषाढी वारीबाबतही अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचं संकट वाढल्याचं आपण पाहिलं. वारकऱ्यांनाही ते समजून सांगण्यात आलं. पण वारकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून अजून एक संधी देऊन पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश या कमिटीमध्ये असेल. या कमिटीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वारीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजितदादांनी दिलीय.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

Ajit Pawar’s reply to Chandrakant Patil’s claim that government will fall

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.