“बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक फार काळ उध्दव ठाकरेंसोबत राहू शकत नाही”
Pravin Darekar on Manisha Kayande ; मनिषा कायंदे यांचं पक्षांतर प्रवेश अन् शिवसेनेच्या वर्धापन दिनावर भाजपची प्रतिक्रिया काय?
अकोला : ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यावर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक फार काळ उध्दव ठाकरे सोबत राहू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने उध्दव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवली. शरद पवारच्या आंजोळीने पाणी पिलं. यातून शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे तो एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत.
एकनाथ शिंदेंनी बाजूला होऊन आमच्यासोबत सरकार स्थापन केलं. उरले सुरले मंडळी ही उद्धव ठाकरेमध्ये बदल होईल. हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना नव्याने उभी करतील अशी अपेक्षा होती. मात्र येरे माझ्या मागल्या हीच स्थिती दिसत आहे. राहिलेले चांगले नेते, कार्यकर्ते शिंदेसाहेब किंवा भाजपची कास धरतील, असं प्रविण दरेकर म्हणालेत.
आपल्यात असलं की सोनं अन् दुसऱ्यांचं असलं की कचरा! संजय राऊत कचऱ्यासारखे वागतात, बोलतात. म्हणून त्याxना सगळं कचरा वाटतोय, असं म्हणत प्रविण दरेकरांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरवर जात डोकं टेकवलं. त्यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटत दुर्दैवी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानचा अपमान आहे. या प्रकरणी उध्दव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांनासोबत घेऊन आघाडी बनविण्यापर्यंत त्याचे सलोख्याचे संबंध आहेत. या संदर्भात भूमिका काय ठाकरे सेनेची भूमिका काय हे जनते समोर यायला पाहिजे, असं दरेकर म्हणालेत.
तो बचकंडा आहे. अजून 25 नाही. 250 कामे मी देतो अमोल मिटकरीला रांगायचं आहे. अजून तुमची औकात ही देवेंद्र फडणवीसांवर बोलावं एवढी नाही. विकास कामावर बोलायचं अकोल्यातले आमदार या जिल्ह्यासाठी काय काम याची यादीच त्याला पाठवतील, असं म्हणत अमोल मिटकरी यांच्या टीकेला प्रविण दरेकरांनी उत्तर दिलं आहे.
आमच्यात गट नाही. भाजप हा एकच गट नेतृत्व आहे. रणजित पाटील, रणधीर सावरकर भाजपच्या झेंड्याखाली काम करतो गटबाजी आहे असं मानत नाही, असं म्हणत भाजपतील गटबाजीच्या चर्चांवर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.