मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेनामी मालमत्तेची माहिती लपवली, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकार काहीही करू शकते. इंग्रजांच्या काळातील 99 वर्ष करारावर देण्यात आलेल्या जमिनी 999 वर्ष करण्यात आल्या. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा 999 केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यावेळ त्यांनी याबाबतचे सर्व पुरावे असल्याचाही दावा केला (Allegations of Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray).
ठाकरे सरकार काहीही करू शकते. इंग्रजांच्या काळातील 99 वर्ष करारावर देण्यात आलेल्या जमिनी 999 वर्ष करण्यात आल्या. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा 999 केली. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याला देत आहे. तिथे जाण्याचा रस्ताही आमचाच आहे असं ते म्हणत आहेत. शरद पवारांचे जवळचे आणि ठाकरे परिवारांचे मित्र शाहिद बालवा, अविनाश भोसले, विनोद गोयंका यांच्यावर ठाकरे सरकार मेहेरबान आहे.”
“शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्रावरून महापालिकेने 200 कोटी रुपयांचे टीडीआर दिले आहेत. ठाकरे सरकारनं हायकोर्ट, पुरातत्व विभाग आणि महापालिकेचा निर्णय बाजूला सारत 200 कोटी रूपयांचे डेव्हलपमेंट राईट्स आपल्या बिल्डर्स मित्रांना दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आदेशानं 200 कोटी रूपयांचा फायदा बिल्डर्सला दिला जात आहे. या बिल्डर्सला देण्यात आलेला 999 वर्षांचं करारपत्र दाखवावंच असं माझं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान आहे,” असंही किरीट सोमय्या म्हणाले.
‘उद्धव ठाकरेंनी प्रतिज्ञापत्र देताना बेनामी संपत्तीची माहिती लपवली, तक्रार करणार’
किरीट सोमय्या म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती देताना आपल्या बेनामी संपत्तीची माहिती लपवली. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. अन्वय नाईक यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे मोठे आर्थिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची 23 हजार 500 चौरस फूटांची 19 घरं आहेत. ही एकूण 5.29 कोटींची बेनामी मालमत्ता आहे.”
हेही वाचा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि विदर्भातील आठ प्रश्न!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर, सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल, तर्कवितर्कांना उधाण
Allegations of Kirit Somaiya on CM Uddhav Thackeray