Ravi Rana | ‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

Ravi Rana on Shiv Sena : टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन बोलताना खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला.

Ravi Rana | 'ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना' शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!
छ.शिवाजी महाराज पुतळा (संग्रहित फोटो, रवी राणा फेसबुक)
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 3:23 PM

अमरावती : अमरावतीत राजकारण तापलंय. आज पहाटे अमरावतीमध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) पुतळा हटवण्यात आला आहे. रवी राणा यांनी विनापरवाना हा पुतळा उभारल्यानं या पुतळ्यावर पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला होता. त्यानंतर बराच वेळ नवनीत राणा आणि रवी राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) टीका करण्यात आली आहे. यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवप्रेमींच्या मागणीखातर हा पुतळा उभारल्याचं राणा दाम्पत्यानं माध्यमांशी बोलताना म्हटलंय. यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना नंतर ताब्यातही घेण्यात आलंय.

रवी राणा काय म्हणाले..

टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन बोलताना खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. तसंच ‘आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. ही पद्धत अत्यंत चुकीची असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ – रवी राणा यांनी फोनवरुन काय म्हटलं?

छत्रपतींच्या पुतळ्यासाठी परवानगीची गरजच काय?

दरम्यान, पालिकेनं केलेल्या दाव्यानुसार हा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आला होता. त्यामुळे या पुतळ्यावर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा बसवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राणा दाम्पत्यानं सातत्यानं केली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आल्यानं अखेर राणा दाम्पत्यानं शिवप्रेमींच्या मागणीखातर हा पुतळा उभारला असल्याचा दावा केला आहे. आता या पुतळ्यावर कारवाई केल्यानंतर रवी राणा यांच्यासोबत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीदेखील झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाड चांगलाच गाजण्याचीही शक्यता आहे.

काय नेमकं प्रकरण?

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj Statue) यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस (Police) प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. काल, रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले व  नंतर हा पुतळा काढण्यात आला.हा पुतळा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने काढला आहे.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Amravati | Ravi Rana यांनी अमरावतीत विनापरवानगी बसवलेला शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला

रवीजींचं नाव घेते मी सून राणांची… नवनीत राणांचा हटके उखाणा

Amaravati : राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात; खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने कारवाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.