शिंदे गटालाच सरन्यायाधीशांनी Who are you विचारलंय, अंबादास दानवे म्हणतात उत्तर येईल तेव्हा…
शिंदे गटाने आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवण्याची मागणी केली. याचाच अर्थ त्यांनी आगामी निवडणुकांचा धसका घेतलाय, असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय.
जालनाः सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज सरन्यायाधीशांनी शिंदे गटालाच हू आर यू असा प्रश्न विचारलाय. त्यामुळे आता त्यांना हे उत्तर द्यावं लागेल. त्यानंतरच सर्व प्रश्नांचा निकाल लागेल, असं खोचक वक्तव्य अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दानवे यांनी जालन्यात ही प्रतिक्रिया दिली. शिवसेना (Shivsena) विरोधात शिंदेगट अशी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी झाली. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जावं, अशी मागणी शिंदे गटातर्फे करण्यात आली. मात्र कोर्टाने ती फेटाळली. यावर बाजू मांडण्यासाठी शिवसेनेला वेळ देण्यात आलाय.
शिंदे गट नेमका कोण?
शिंदे गटाने शिवसेना पक्षातून बाहेर पडल्याचं मान्य केलेलं नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत पण पक्षाचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका यापूर्वीही त्यांनी कोर्टासमोर मांडली आहे.
शिवसेना सोडली नसल्याने पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूदी आम्हाला लागू होत नाही, असा दावा शिंदे गट करतोय. मात्र आज सरन्यायाधीशांनी शिंदे गटालाच तुम्ही कोण आहात, असा प्रश्न विचारलाय. याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय.
शिंदे गटानं धसका घेतलाय…
शिंदे गटाने आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवण्याची मागणी केली. याचाच अर्थ त्यांनी आगामी निवडणुकांचा धसका घेतलाय, असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय.
औरंगाबादेत आज धाडी
औरंगाबादमध्ये आज आयकर विभागाने काही व्यापाऱ्यांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या आहेत. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले,’ धाडी, ईडी इन्कम टॅक्सचा वापर दबाव टाकण्यासाठी होतोय. भाजपला लोक बधत नाहीत. जनता शिवसेनेच्या मागे उभी आहे. त्यामुळे त्यांना काय करायचं ते करू देत. आमच्याकडे काहीही सापडणार नाही…
दसरा मेळावा
56 वर्षांपासून मेळावा होत आलेला आहे. यंदाचा दसरा मेळावाही त्याच मैदानावर होणार. उद्धवजी ठाकरे मार्गदर्शन करणार. ही लोकशाही आहे आणि सरकारलाही तसंच वागावं लागेल. इथं जनतेची दादागिरी चालते, असं वक्तव्य दानवेंनी केलं.