Amit Shah Visit Mumbai Maharashtra Live : कमल हमारा लक्की है, जीत हमारी पक्की है; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा नवा नारा

| Updated on: Sep 05, 2022 | 10:03 PM

Amit Shah Visit Mumbai Maharashtra Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाच्या दर्शनापासून ते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींपर्यंत! वेगवेगळ्या कारणांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व, त्यांच्या मुंबई दौऱ्याशी संबंधित सर्व घडामोडींचा वेगवान आढावा एका क्लिकवर

Amit Shah Visit Mumbai Maharashtra Live : कमल हमारा लक्की है, जीत हमारी पक्की है; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा नवा नारा
अमित शाह यांचा मुंबई दौरा LIVE UpdateImage Credit source: TV9 Marathi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आज दौऱ्यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या मुंबई दौऱ्याचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेणार आहोत, एका क्लिकवर…

Amit Shah in Mumbai, Amit Shah visit mumbai Live, Amit Shah visit Lal baug ganesh pandals, Amit Shah visit Mumbai ganesh pandals

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Sep 2022 04:30 PM (IST)

    सोलापुरात काॅंग्रेसला मोठा धक्का; महिला पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील

    काँग्रेसेचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कट्टर समर्थक व महिला काॅंग्रेसच्या प्रदेश सचिव मुबीना मुलाणी  यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे सोलापुरात काॅंग्रेला मोठा धक्का बसला आहे.
    राज्यातील काॅंग्रेचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच  काॅंग्रेच्या महिला प्रदेश सचिव मुबीना मुलाणी यांनी काॅंग्रेच्या सर्व पदांचे राजीनामे देत आज पंढरपूर रेस्टहाऊस येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवाजी सावंत  यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात शेकडो महिला कार्यकर्त्यांसमवेत  प्रवेश केला.
  • 05 Sep 2022 04:15 PM (IST)

    अमित शहांनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विराजमान झालेल्या विघ्नविनाशक श्री गणाधिशाचे मनोभावे दर्शन घेतले.

    याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहा यांना श्री गणेशाची मुर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे हे उपस्थित होते.

  • 05 Sep 2022 03:05 PM (IST)

    ‘मुंबई महापालिका ही दुभती गाय, तिला आपल्याकडे आणायची आहे’

    मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे लक्ष 150चे आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. या खऱ्या शिवसेनेसोबत आमची युती असेल. कमल हमारा लक्की है, जीत हमारी पक्की है, हा आमचा नवा नारा आहे. मुंबई महापालिका ही दुभती गाय. तिला आपल्याकडे आणायची आहे, असे वक्तव्य भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी केले आहे.

  • 05 Sep 2022 03:00 PM (IST)

    मुंबई  महापालिका जिंकून येण्यासाठी अमित भाईंनी केलं मार्गदर्शन – मेहता

    मुंबई  महापालिका जिंकून येण्यासाठी आज अमित शाह यांनी मार्गदर्शन केले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत भाजपा निवडणूक लढवणार आहे, अशी बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती भाजपा नेते प्रकाश मेहता यांनी दिली आहे.

  • 05 Sep 2022 01:48 PM (IST)

    खयाली पुलावमुळे शिवसेनेची आताची ही अवस्था- अमित शाह

    खयाली पुलावमुळे शिवसेनेची आता ही अवस्था झाली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केला नाही, असं ते म्हणाले. भाजप पदाधिकारी आणि नेत्यासोबतच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलंय. मेघदूत बंगल्यावर अमित शाह यांच्यासोबत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक सुरु आहेत.

  • 05 Sep 2022 01:45 PM (IST)

    अमित शाह यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

    मेघदूत बंगल्यावरील बैठकीत अमित शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 2 सीटसाठी शिवसेनेनं 2014मध्ये युती तोडली होती, असं अमित शाह यांनी म्हटलंय. तसंच शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळेच छोटी झाली असल्याचंही ते म्हणालेत. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांशी बोलताना अमित शाह यांनी हीे वक्तव्य केलंय.

  • 05 Sep 2022 01:17 PM (IST)

    मुंबई पालिकेसाठी अमित शाह कितीचं टार्गेट देणार?

    मुंबई पालिकेसाठी अमित शाह कितीचं टार्गेट देणार? याची चर्चा रंगली आहे. 135 ते 140 जागा जिंकण्याचं मिशन मुंबई भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. आज संध्याकाळी भाजपच्या पालिकेतील नगरसेवक, नेते आणि राज्यातील आघाडीच्या नेत्यांना मार्गदर्शन करताना याबाबत अमित शाह भाष्य करण्याची शक्यता आहे.

    रस्त्यावर उतरुन कामाला लागा, अशा सूचना अमित शाह यांनी मेघदूत बंगल्यावरील बैठकीतून दिल्या आहेत.

  • 05 Sep 2022 01:11 PM (IST)

    सागर बंगल्यावर कुणाकुणाची हजेरी?

    गिरीष महाजन, अमित साटम, मंगल प्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, अतुल भातखळकर देखील सागर बंगल्यावर दाखल, भाजप कोअर कमिटीआधी राज्यात भाजपच्या नेत्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा, सागर बंगल्यावर अमित शाह यांची भाजपच्या राज्यातील नेत्यांसोबत खलबतं

  • 05 Sep 2022 01:03 PM (IST)

    भाजप कोअर कमिटीच्या बैठकीची वेळ, ठिकाण बदललं!

    भाजप कोअर कमिटीच्या बैठकीची वेळ आणि ठिकाण बदललं. भाजपची बैठक आता संध्याकाळी पाच वाजता होणार. मेघदूत बंगल्यावर अमित शाह भाजपचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांना मार्गदर्शन करणार आहेत.

    सध्या अमित शाह हे सागर या फडणवीस यांच्या बंगल्यावर आहेत. तिथे भाजपचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते, मंत्रीही हजर आहे. याच ठिकाणी आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यताय.

  • 05 Sep 2022 12:44 PM (IST)

    सागर बंगल्यावर भाजपचे नेते, मंत्री दाखल

    अमित शाह गेल्या 15 मिनिटांपासून सागर बंगल्यावर आहेत. त्याच ठिकाणी भाजपचे बडे नेते आणि मंत्रीही दाखल झालेत. याठिकाणीच भाजपची बैठक पार पडणार आहे. ‘मिशन मुंबई’च्या पार्श्वभूमीवर भाजप कोअर कमिटीच्या सागर बंगल्यावरील बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय.

  • 05 Sep 2022 12:25 PM (IST)

    अमित शाह सागर बंगल्यावर दाखल

    अमित शाह यांचा ताफा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. या बंगल्यावर भाजपची बैठक होईल. या बैठकीसाठी नितेश राणे, अतुल भातखळकर हे देखील दाखल झालेत. सागर बंगल्यावर अमित शाह आधी फडणवीस यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतील. त्यानंतर बैठक होईल.

    काय होणार भाजपच्या बैठकीत? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींकडून, पाहा व्हिडीओ

  • 05 Sep 2022 12:04 PM (IST)

    आशिष शेलार यांच्या घरी शाहांची हजेरी

    आशिष शेलार यांच्या घरी अमित शाह यांनी सहकुटुंब हजेरी लावली आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. वांद्रेतील आशिष शेलार यांच्या निवासस्थानी ते गेले. त्याआधी घराजवळच्याच सार्वजनिक मंडळाला त्यांनी भेट दिली होती.

  • 05 Sep 2022 11:57 AM (IST)

    अमित शाह वांद्रेमध्ये दाखल

    अमित शाहांनी घेतली वांद्रेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भेट, बाप्पाच्या दर्शनानंतर विशेष अभिप्रायही शाह यांनी लिहून दिला. सहकुटुंब अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत…

  • 05 Sep 2022 11:50 AM (IST)

    शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार

    आजच्या शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार

    पुणे जिल्ह्यातील १६ शिक्षक मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधणार

    पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व शिक्षक ऑनलाइन असणार

  • 05 Sep 2022 11:42 AM (IST)

    शेलारांच्या घरी रवाना होण्याआधी शाह शिंदेंना काय म्हणाले?

    Amit Shah And Ekanth Shinde discussion : आशिष शेलार यांच्या घरी अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन रवाना झाले. त्याआधी गाडीत बसून मार्गस्थ होण्याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत केली. काही गोष्टी अमित शाह एकनाथ शिंदे यांचा सांगत होते. एकनाथ शिंदेंकडून मान हलवून या गोष्टी मान्य करताना दृष्यांमध्ये दिसले. नेमकं यावेळी अमित शाह यांनी काय सांगितलं हे कळू शकलेलं नाही. मात्र हे दृश्य माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपलं केलं. या दृश्याची चर्चा झाली नसती, तरच नवल. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून झाल्यानंतर अमित शाह गाडीत बसले आणि पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

    सुरुवातीला एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या सोबत लालबागच्या राजा येथे बाप्पाच्या दर्शनाला नसतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र अखेर मुख्यमंत्रीही अमित शाह यांच्यासोबत दिसून आलेत.

  • 05 Sep 2022 11:40 AM (IST)

    महाराष्ट्रातील 3 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

    महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी 2022 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर.

    आज शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार

    बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांड्याचे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक शशिकांत कुलथे,पारगाव जोगेश्वरी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांचा या पुरस्कारामध्ये समावेश

  • 05 Sep 2022 11:38 AM (IST)

    अमित शाह आले, हा मंडळासाठी अभिमानास्पद क्षण- लालबागचा राजा मंडळ

    लालबागचा राजा गणेश मंडळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. हा मंडळासाठी अभिमानास्पद क्षण होता. ते दरवर्षी इथं येत असतात. लालबागचा राजाचे अमित शाह हे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्यासोबत ते बातचीत करत होते.

  • 05 Sep 2022 11:29 AM (IST)

    लालबागच्या राजाच्या चरणी अमित शाह यांच्यासोबत कोणकोण?

    Amit Shah at lalbaug cha Raja : अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शिवाय मुंबई भाजपची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते आशिष शेलारही सोबत होते. याव्यतिरीक्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे देखील आवर्जून हजर असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अमित शाह यांनी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्याशीही संवाद साधला. भाजपचे मनोज कोटक हे देखील यावेळी हजर होते.

  • 05 Sep 2022 11:26 AM (IST)

    अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली आणि राजाच्या चरणी डोकं टेकलं.

  • 05 Sep 2022 11:23 AM (IST)

    Amit Shah at Lalbaugcha Raja : अमित शाह लालबागमध्ये दाखल

    अमित शाह लालबागमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. लालबागचा राजा मंडळात अमित शाह यांच्या भेटीनिमित्त विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चोख सुरक्षेत ते लालबागच्या राजा मंडळात गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत.

    पाहा व्हिडीओ :

  • 05 Sep 2022 11:21 AM (IST)

    रोहित शेट्टी अमित शाह यांना का भेटला? चर्चांना उधाण

    Amit Shah Rohit Shetty Meet : अमित शाह यांची सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी याने भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भेट झाली. सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट झाली. सकाळी रोहित शेट्टी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाला होता. यावेळी रोहित शेट्टी आणि अमित शाह यांच्या नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकलेलं नाही. मात्र या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळासोबतच बॉलिवूडमध्ये रंगली आहे.

    अमित शाह यांचं ट्वीट :

  • 05 Sep 2022 11:18 AM (IST)

    Amit Shah : अमित शाह आणि राज ठाकरे भेटीची दाट शक्यता

    Amit Shah Raj Thackeray meet News : अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होण्याची शक्यता आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

    पाहा LIVE :

  • 05 Sep 2022 11:14 AM (IST)

    Video : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना

    Amit Shah in Mumbai :  मुंबईत अमित शाह यांचा दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ते थोड्याच वेळा लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.

    पाहा Live :

  • 05 Sep 2022 11:13 AM (IST)

    पुण्यातील थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी; उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

    थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

    भाजप जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे आणि आमदार राहुल कुल यांची निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

    जिल्ह्यातील सुमारे 20 हजार शेतकऱ्यांना वरदान ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना गेली 12 वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद

    सभासद, शेतकरी व त्यांचे कुटुंबीय या कारखान्यावर अवलंबून

    कारखाना बंद असल्याने सभासद शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

  • 05 Sep 2022 11:11 AM (IST)

    Amit Shah in Mumbai : अमित शाह यांच्यासोबत भाजपचे मुंबईत दिग्गज

    केंद्रीय गृहमंत्री यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते हजर होते. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आशिष शेलार यांच्यासह भाजपचे इतर मुंबई पदाधिकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हजेरी पाहायला मिळाली. इतकंच काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सह्याद्री अतिथीगृहावर असल्याचं दिसून आलं.

  • 05 Sep 2022 11:06 AM (IST)

    Amit Shah : अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावरुन रवाना

    अमित शाह अतिथीगृहावरुन रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात लालबागचा राजा मंडळात गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत.

Published On - Sep 05,2022 11:04 AM

Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.