राज ठाकरेंनी निमंत्रण दिले तर अमित शहा नक्की जातील कारण… रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितले
अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, भाजप नेते आशिष शेलार आदी कार्यकर्त्यांना भेटतील. पण जर निमंत्रण नसेल तर अमित भाई कुठेच जात नाहीत. यामुळे राज ठाकरेंनी निमंत्रण दिले तर ते त्यांना भेटतील असे दानवे यांनी सांगीतले.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लक्षणीय घडामोडी घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांची भेटी झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच आता भाजपचा दिल्लीताल एक बडा नेता राज ठाकरेच्या भेटीला येणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी या भेटीबाबत सांगितले आहे.
अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनानिमित्ताने मुंबईत येत आहेत. यावेळी ते राज ठाकरे यांनी भेट घेणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी जर निमंत्रण दिल तर अमित शाह नक्की जातील कारण त्यांना नाही म्हणण्याचा स्वभाव नाही असे म्हणत दानवे यांनी या भेटीवर जवळपास शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.
अमित शहा दरवर्षी लालबागलाच्या दर्शनासाठी येतात
अमित शहा दरवर्षी गणेशोत्सवात लालबागलाच्या दर्शनासाठी येतात. अमित शाह मुंबईत येत आहेत याचा राजकीय अर्थ लावू नका असे रावसाहेब दानवे म्हणाले.
निमंत्रण नसेल तर अमित भाई कुठेच जात नाहीत
अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, भाजप नेते आशिष शेलार आदी कार्यकर्त्यांना भेटतील. पण जर निमंत्रण नसेल तर अमित भाई कुठेच जात नाहीत. यामुळे राज ठाकरेंनी निमंत्रण दिले तर ते त्यांना भेटतील असे दानवे यांनी सांगीतले.
भाजप मनसे युतीची चर्चा
मनसे भाजप युतीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर राज ठाकरे आणि भाजपने एकत्र येतील असा अंदाज राजकीय जाणकार बांधत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी थेट सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसवण्यात आला आहे. त्यामुळे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब यावं म्हणून फडणवीस यांना आमंत्रण देण्याची ही भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यावेळी दोघांमध्ये तासभर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. 5 सप्टेंबर रोजी भाजचे नेते अमित शाह मुंबईत येत आहेत. यामुळे ते देखील राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.
अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेटीवर प्रतिक्रिया
काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. चव्हाण कुलकर्णी यांच्या घरी दर्शनासाठी गेले असतानाच देवेंद्र फडणवीस देखील तेथे आले होते. यावेळी दोघांमध्ये एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. गणोशोत्सवाच्या निमीत्तान देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांचीही भेट झाली. राजकारण बाजुला ठेवून सगळेच भेटत असतात असे दानवे म्हणाले.