महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये, अमित ठाकरे मैदानात; ‘शिवजनसंपर्क अभियानाला’ सुरुवात

अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईत मनसेच्या 3 शाखांचे उद्घाटन करण्यात आलं. तसंच 'शिवजनसंपर्क अभियानाला' सुरुवात करण्यात आलीय. यावेळी वृक्षारोपण आणि ते वृक्ष दत्तक घेणं, वाचनालयाला भेट देणं आणि महिला सफाई कामगारांना रेशन कीट देनं असे विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडमध्ये, अमित ठाकरे मैदानात; 'शिवजनसंपर्क अभियानाला' सुरुवात
अमित ठाकरे, मनसे
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:36 PM

सुरज मसूरकर, नवी मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईत (Navi Mumbai) मनसेच्या 3 शाखांचे उद्घाटन करण्यात आलं. तसंच ‘शिवजनसंपर्क अभियानाला’ सुरुवात करण्यात आलीय. यावेळी वृक्षारोपण आणि ते वृक्ष दत्तक घेणं, वाचनालयाला भेट देणं आणि महिला सफाई कामगारांना रेशन कीट देनं असे विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी संपूर्ण परिसर मनसेमय झाला होता. महाराष्ट्र सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. 19 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. या अभियाना अंतर्गत नवी मुंबईकरांशी भेटून संवाध साधणार आहोत. या संवादातून नवी मुंबईकरांच्या आणि शहराच्या विकारासाठी विचार, सूचना आणि दृष्टीकोन जाणून घेणार असल्याचं मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलं.

‘मराठी भाषा गौरव दिन दिमाखात साजरा करा’

27 फेब्रुवारी हा मराठी भाषेचा गौरव दिवस जोशात आणि दिमाखात साजरा करा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. तसंच एक पत्रच मनसेच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं आहे. ‘आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. हे इतक्या जोरदारपणे राजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील ते पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा, अशी सूचना राज ठाकरे यांनी केलीय.

इतर बातम्या : 

‘देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?’, के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सवाल

भाजपचं टेन्शन वाढलं, देशातल्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राव यांची गर्जना

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.