शांत आणि लाजऱ्या अमितला अॅनिव्हर्सरी गिफ्ट, थेट मनसेच्या नेतेपदी निवड!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray launching) यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray launching) यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे (Amit Thackeray launching) यांची मनसेच्या नेतेपदी निवड होत असल्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला.
अमित ठाकरे हे अतिशय शांत आणि लाजऱ्या स्वभावाचे आहेत. अमित ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 रोजी झाला. अमित ठाकरे यांचं गेल्यावर्षीच 27 जानेवारी रोजी विवाह झाला. मिताली बोरुडे या मैत्रिणीसोबत त्यांनी लगीनगाठ बांधली. येत्या 27 जानेवारीला अमित ठाकरे यांची पहिली अनिव्हर्सरी आहे. त्यामुळे वडील राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना नेतेपद देऊन अनिव्हर्सरी गिफ्ट दिल्याचं दिसतंय.
Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray’s son Amit Thackeray has been inducted into the party today. pic.twitter.com/79QQjCuull
— ANI (@ANI) January 23, 2020
अमित ठाकरे यांनी मुंबईतील पोदार आणि रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतलं. मिताली बोरुडी यांचं शिक्षण पोदार कॉलेजच्या शेजारील रुईया कॉलेजमध्ये कला शाखेतून झालं. इथेच त्या दोघांची भेट झाली, या भेटीचं मैत्रीत आणि मग पुढे प्रेमात रुपांतर झालं. अमित ठाकरे यांनाही वडील राज ठाकरे यांच्याप्रमाणे चित्रकलेची आवड आहे.
डॅशिंग आणि राऊडी लूकमध्ये दिसणारे अमित ठाकरे आदित्य ठाकरेंपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. अमित ठाकरेंचा जन्म 24 मे 1992 चा आहे. 27 वर्षांचे असणाऱ्या अमित यांनी रुपारेल कॉलेजमधून पदवी आणि त्यानंतर वेलिंगकर कॉलेजातून एमबीए पूर्ण केलं. राजकारणाबरोबरच फुटबॉल, सायकलिंग आणि किक बॉक्सिंग आणि महत्वाचं म्हणजे बंजी जम्पिंग हा साहसी प्रकारही अमित ठाकरेंचा आवडता खेळ आहे. काही महिन्यांपूर्वीच अमित ठाकरेंचा बंजि जम्पिंगचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
मनसे पक्षाच्या जन्मापासून ”तरुण” वर्ग हाच मनसेचं बलस्थान राहिला आहे. राज ठाकरेंनी पन्नाशी ओलांडली असली, मनसेच्या मतांचा टक्का घसरला असला, तरी तरुणांमध्ये राज ठाकरेंनी क्रेझ आजही कायम आहे. मात्र पक्षाची धोरणात्मक पुर्नबांधणी करताना अमित ठाकरेंच्याही राजकारणाचा श्रीगणेशा होणार आहे.
फटकारे चित्रावरचे असोत की मग जाहीर सभेतले, राज ठाकरेंचा हात कुणीच धरत नाही. वडील राज ठाकरेंप्रमाणेच चित्रकलेतही अमित ठाकरेंचा हात पारंगत आहे. त्यामुळे चित्रकलेबरोबरच राजकारणात राज ठाकरेंची ही नवी पीढी कशी छाप सोडणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या
राजकारण ते बॉलिवूड, अमित ठाकरेंच्या लग्नाला या दिग्गजांची हजेरी