Amol Kirtikar : 19 व्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रात काय घडलं? अमोल किर्तीकर म्हणाले…VIDEO
Amol Kirtikar : मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक निकाल देताना घोटाळा झाला असून उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर जिंकले आहेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांनी अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येत आहे. निवडणूक निकाल देताना घोटाळा झाला असून उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर जिंकले आहेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे. स्वत: अमोल किर्तीकर या निवडणूक निकालाबद्दल व्यक्त झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालाला कोर्टात आव्हान देण्याात येणार आहे.
“4 जूनला त्या ठिकाणी मी उशिरा पोहोचलो. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलय, ते मिळत नाहीय. तो पर्यंत काहीही बोलू शकत नाही. 19 व्या फेरीनंतर बराचवेळ घोषणा झाली नाही. तिथली परिस्थिती तशीच होती. 19 व्या राऊंडनंतर फायलन टॅली येईपर्यत घोषणा का झाली नाही? प्रत्येक राऊंडनंतर घोषणा होते. 48 मतांनी पराजय झाला की, 48 मतांनी पराभव केलाय याच उत्तर सीसीटीव्ही फुटेजमधूनच मिळू शकतं” असं अमोल किर्तीकर म्हणाले. ‘ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल’
तुम्ही त्यावेळी लेखी आक्षेप का नाही घेतला? यावर अमोल किर्तीकर म्हणाले की, “चीफ इलेक्शन एजंट सर्वांशी व्यक्तीगत पातळीवर बोलले. पूर्नमतमोजणीची मागणी करताना लेखी आक्षेप घेतला. तो मान्य केला नाही. आरओंनी मौखिक आदेश दिले होते की नाही? ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल. काहीतरी काळबेर आहे की काय असं वाटतय” असं अमोल किर्तीकर म्हणाले. “मला ज्यांनी मतदान केलय, त्यांना आक्षेप आहे. त्यांचा संशय दूर होत नाही, तो पर्यंत, आम्ही शेवटपर्यत उभे राहू” असं अमोल किर्तीकर म्हणाले.