संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो,तर माईक बंद केला – खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाहीत.पण आमच्यापेक्षा देवापेक्षा कमी नाहीत,असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे, संसदेचं सध्या हिवाळी

संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो,तर माईक बंद केला - खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 3:12 PM

दिल्ली : महाराष्ट्रात वारंवार शिवाजीमहाराजांविषयी जी अपमानजनक वक्तव्य केली जात आहेत. त्यावर कायद्यात तरतूद व्हावी, फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही , तर इतर महापुरुषांविषयी देखील बोलताना कायद्याची तरतूद करावी अशी मागणी, खासदार अमोल कोल्हे हे संसदेत करत होते, तेव्हा अमोल कोल्हे यांचं संपूर्ण बोलणं संपण्याआधी माईकचा आवाजचं संसदेच्या अध्यक्षांनी बंद केला, आणि ‘हो गया’, असं म्हटलं, त्यावर माईक बंद केल्यानंतरही अमोल कोल्हे यांनी, ‘हो गया नही अध्यक्ष महोदय, बोलने का मौका दिजिए’ असं म्हणत आपली भूमिका संसदेत सादर केली.

यानंतर बाहेर येऊन खासदार अमोल कोल्हे यांनी या विरोधात आपला एक व्हीडिओ बनवला, त्यात संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो तर माईक बंद केला, माईक बंद केला तरी शिवाजी महाराजांविषयी भावना दाबता येणार नाहीत, तो तमाम शिवभक्तांचा आवाज, कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाहीत.पण आमच्यापेक्षा देवापेक्षा कमी नाहीत,असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे, संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे, शून्य प्रहरात ते आपला प्रश्न मांडत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अपमान केल्याचा आरोप होत आहे, यानंतर महाराष्ट्रात काही संघटनांनी आंदोलन देखील केलं आहे, यानंतर या प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सर्वच महापुरुषांच्या अपमानाबाबतीत एक ठोस कायदा करण्यात यावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे, याविषयी अमोल कोल्हे यांनी ट्ववीटरवर व्हीडिओ देखील अपलोड केला आहे, यात अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.