Amol Mitkari: कन्यादान शब्दावरुन पेटलं! ब्राम्हण महासंघाच्या आंदोलनावरुन मिटकरी म्हणतात, राज्यपालांचं विधान आठवा

Amol Mitkari : सांगलीच्या इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला होता.

Amol Mitkari: कन्यादान शब्दावरुन पेटलं! ब्राम्हण महासंघाच्या आंदोलनावरुन मिटकरी म्हणतात, राज्यपालांचं विधान आठवा
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी आमदारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 1:23 PM

सिंधुदुर्ग : लग्नाच्या विधीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे एकीकडे अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांच्यावर भाजपनं टीका केली. तर दुसरीकडे आज पुण्यात ब्राम्हण महासंघाचे (Brahman Mahasangh) कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयावर (NCP Office Pune) धडकले. यानंतर सगळ्या वक्तव्याप्रकरणी अमोर मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज्यपाल महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल बोलले, त्याबद्दल तुम्ही बोलले नाही, पुरंदरेंच्या लिखाणावर बोलले नाही, असं म्हणत चिमटे काढलेत. ‘ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी सगळं तपासावं. कन्यादान हा कन्या दान विरोध करण्याचा विषय नाहीय, स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चारला तो मी सांगितला, माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा, कुठल्याही समाजावर टीका केली नाही, असंही अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. दरम्यान, माफी मागण्याच्या मुद्द्यावर बोलताना अमोल मिटकरांनी, कशाची माफी मागायची? असा उलट सवाल विरोधकांना विचारला आहे.

आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल महात्मा फुले सावित्रीबाईंबद्दल बोलले त्याबद्दल तुम्ही बोलले नाही. किंवा पुरंदरेंनी छत्रपतींवर जे लिखाणा केलं, त्यावर तुम्ही बोलले नाही. मला मां जिजाऊ महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल तुम्ही बोलत नाही, असं म्हणत अमोल मिटकरींनी पलटवार केला आहे.

दरम्यान, मनसे नेत्यानं केलेल्या टीकेलाही अमोल मिटकरींनी उत्तर दिलंय. ते माझी गोधडी बघायला आले असतील, असं म्हणत अमोल मिटकरींनी फटकारलंय. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरांनी म्हटलंय, की…

ते माझी गोधडी बघायला आले असतील, बाळासाहेब ठाकरे खूप मोठे आहे, मी प्रबोधनकारांचा वारसा चालवतोय, मी लहान अस हम आह भी भरते है बदनाम हो जातें हे, वो कत्ल मी करते है तो चर्चा नहीं बनती, चर्चा तो जरुर बनेगी.

नेमकं ते विधान काय होतं?

सांगलीच्या इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला होता. कन्या हा दान करण्याचा विषय नाहीये, असं त्यांनी म्हटलं होतं. कन्यादानावेळी सांगितलेल्या मंत्राचा अर्थ मी सांगितला होता, असं मिटकरींनी म्हटलंय. तसंच संस्कृतचा मी जाणकार आहे. अभ्यासक आहे. मला जर कोणते प्रश्न कळले नाही, तर त्याची उत्तर मी जाणकारांकडून समजून घेईन, असंही मिटकरींनी म्हटलंय. दरम्यान, अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्यावरुन आता नवा वाद उफाळून आलाय.

पाहा व्हिडीओ :

मिटकरींचं विधान, पुण्यात आंदोलन

दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पुण्यात ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते यांच्या जुंपली देखील. यावेळी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करता चुकीचा भाषा वापरली, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्यावरुन ब्राम्हण महासंघाच्यावतीने संताप व्यक्त करण्यात आला आहे.

पाहा मिटकरींचं ते वक्तव्य!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.