‘हा ड्रामा, हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण’, सोमय्या, पडळकरांच्या आंदोलनावर अमोल मिटकरींची तिखट शब्दात टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर तिखट शब्दात जोरदार टीका केलीय. 'हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे', अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी निशाणा साधलाय.

'हा ड्रामा, हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण', सोमय्या, पडळकरांच्या आंदोलनावर अमोल मिटकरींची तिखट शब्दात टीका
गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 6:14 PM

मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोलीत केलेलं आंदोलन. त्यानंतर आत सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचं आंदोलन. या दोन्ही आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर तिखट शब्दात जोरदार टीका केलीय. ‘हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सोमय्या, पडळकर आणि खोतांवर निशाणा साधलाय.

किरीट सोमय्या यांनी शनिवारी दिवसभर दापोलीमध्ये अनिल परब यांच्याविरोधात रान पेटवलं. त्यानंतर रविवारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन ठाकरे सरकारला आव्हान दिलं. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्वीटरद्वारे टीकास्त्र डागलंय. ‘हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे . आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल. #मंगळसुत्रचोर’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सोमय्या, पडळकर आणि खोतांवर जोरदार टीका केलीय.

‘गोपीचंद पडळकरांचा डिजीटल गनिमी कावा’

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केलाय. एकीकडे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विरोध केला होता. तसंच मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणं शक्य नसल्याचं पाहायला मिळत होतं. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा आपला गनिमी कावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.

आमच्या दृष्टीने लोकार्पण संपन्न – पडळकर

लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, लोकांनी कुठलं काम हाती घेतलं की कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी ते काम अडत नाही. 21 व्या शतकात टेन्कोलॉजीचा वापर करुन आम्ही ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडलाय, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

इतर बातम्या : 

नव्या धमकी बद्दल धन्यवाद, महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार का? संजय राऊतांचा सवाल

Pramod Sawant : उद्या गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.