Abdul Sattar | ये ‘मीठा’ है, वो कडू है, अब्दुल सत्तार यांची मेळघाटात मिश्किल टिप्पणी, विरोधकांवर तुफ्फान बरसात

Abul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. सत्तारांनी या दौऱ्यात खास स्टाइलने विरोधकांवर टीका करत तुफ्फान शेरेबाजी केलीय.

Abdul Sattar | ये 'मीठा' है, वो कडू है, अब्दुल सत्तार यांची मेळघाटात मिश्किल टिप्पणी, विरोधकांवर तुफ्फान बरसात
कृषीमंत्री अब्दुल सत्तारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 11:36 AM

अमरावतीः कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या दौऱ्यात सत्तारांच्या राजकीय शेरेबाजीची तुफ्फान चर्चा होतेय. नुकतंच त्यांनी केलेलं एक वक्तव्य खूप गाजतंय. मेळघाटमधील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्याशी संवाद साधताना त्यांनी हसत हसतच बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) निशाणा साधला… ये मीठा है और वो कडू है.. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाठींबा देण्यासाठी गुवाहटीत गेल्यानंतरही बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच विविध नेतेही त्यांना यावरून टोले मारत आहेत. आता अब्दुल सत्तारांच्या या टिप्पणीवर बच्चू कडू काय म्हणतात, हे पहावं लागेल.

पहाटे 5 पासून दौरा सुरू

माझा एक दिवस बळीराजासाठी.. या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधून सुरुवात झाली. धारणी तालुक्यातल्या सादराबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्रीच दाखल झाले. गावातले शैलेंद्र सावलकर यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला. पहाटे पाच वाजेपासूनच त्यांनी शेतकरी बांधवांशी चर्चा सुरु केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हे सुद्धा वाचा

रानभाजी-भाकरीच्या जेवणाचीही चर्चा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी चुन्नीलाल पटेल यांच्या घरी पाहुणचार घेतला. यावेळी त्यांनी रानभाजी आणि भाकरीचे जेवण केले. कृषीमंत्र्यांनी एवढ्या साधेपणाने शेतकऱ्याचा पाहुणचार स्वीकारल्याने याचीही अमरावतीत जोरदार चर्चा सुरु आहे.

दुश्मन की दुवा करनेवाला मुख्यमंत्री

अब्दुल सत्तार यांनी जळगावात मुक्ताई नगर येथील दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना ते म्हणाले, दुश्मन की दुवा करने वाला मुख्यमंत्री इस राज्य मे है… आमचं सरकार गतिमान आहे. पण याआधीचं सरकार गतीनं गेलं, अशी टिप्पणीही सत्तारांनी केली. सध्याचं सरकार कोणत्याही स्थितीत कोसळणार, मंत्री अपात्र होतील, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील दौऱ्यात केलं होतं.

मिटकरींच्या पोटात का दुखतंय…

मुक्ताईनगरमध्येच अमोल मिटकरी यांना उद्देशून बोलताना, अब्दुल सत्तार म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून कोणताही मुख्यमंत्री एवढा फिरला नसेल. मी फिरतोय तर मिटकरी यांच्या पोटात दुखायला लागलं.. रात्रीच्या वेळी कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दौरा करतात, अशी उपरोधिक टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.