Amravati News : राणा दाम्पत्याने औकातीत राहावं, यशोमती ठाकूर यांचा गंभीर इशारा

Congress Leader Yashomati Thackur on Navnnet Rana Ravi Rana : नवनीत राणा यांच्या पैसे लाटल्याच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांचं; म्हणाल्या, रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही चोरआहेत. त्यांनी औकातीत राहावं, वाचा सविस्तर...

Amravati News : राणा दाम्पत्याने औकातीत राहावं, यशोमती ठाकूर यांचा गंभीर इशारा
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:48 PM

अमरावती | 13 सप्टेंबर 2023 : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसने काल जनसंवाद यात्रा काढली. गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगावमधूनग ही जनसंवाद यात्रा निघाली. जनसंवाद यात्रेत यवतमाळमधील कलावती बंदूरकर देखील सहभागी झाल्या होत्या. यावर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जोरदार टीका केली. यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून पैसे घेऊन दुसऱ्याचा प्रचार केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. या सगळ्याला यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे. राणा दाम्पत्याने आपल्या औकातीमध्ये राहावं. हे सहन करून घेतलं जाणार नाही, असा गंभीर इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

इकडे जाणार तिकडे जाणार अशा उगाच अफवा आणि लफंडूपणा करायचा नसतो… तुम्हाला वहिनी म्हणून स्वीकारलं आणि निवडून आणायला दार दार फिरलो… तुमचं सर्टिफिकेट खोट आहे. त्याच चोर निघाल्या. आम्ही काँग्रेस पक्षाला सर्वस्व माननारी माणसं आहोत. काँग्रेस आमच्या रक्तात आहे. काँगेसच्या पलीकडे आम्ही दुसरा कोणताच विचार करत नाही, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

रवी राणांनी औकातीमध्ये राहावं. माझ्या वडिलांनी जमिनी देण्याचं काम केलं आहे. रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे. पैसे घेतले असेल तर सिद्ध करून दाखवा राजकारण सोडेल. हे सहन करून घेणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी काल यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत रवी राणा कडून कडक नोटा घेतल्या. रक्ताचे अश्रू काढण्याचं तुम्ही काम केलं आणि प्रचार दुसऱ्याचा केला, असं म्हणत नवनीत राणा यांनी नाव न घेता यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली होती. तर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले तेव्हा त्या यादीत यशोमती ठाकूर यांचंही नाव होतं. मंत्रिपद मिळाल नाही म्हणून यशोमती ठाकूर भाजपमध्ये गेल्या नाहीत, असा दावा रवी राणा यांनी केला होता. त्याला आता यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान जे खरं होतं ते मी बोलले. म्हणून यशोमती ताईला झोंबलं. कडक नोटा पैसे दिल्याचे पुरावे नसतात. हे लहान लेकराला माहित आहे. यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात डॉक्टरकडून बिपीची गोळी घ्यावी नाहीतर मी त्यांना पाठवते, असं म्हणत यशोमती ठाकूर यांच्या टीकेला नवनीत राणा यांनी उत्तर दिलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.