Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

पहिल्यांदाच सहकार निवडणूक लढवली आणि विजयी झालो. राजकारणात कधीही गणितं बिघडू शकतात. गणित हे भागाकार, गुणाकार, वजाबाकी होऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष कोण होईल हे प्रश्नचिन्ह आहे. माझ्याकडं मतं कमी होते तरी मी विजयी झालो. याचा महाविकास आघाडीवर कुठलाही फरक पडणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया
बच्चू कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 2:14 PM

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Amravati District Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत अखेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पॅनलनं बाजी मारलीय. या निवडणुकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केलाय. या विजयानंतर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच सहकार निवडणूक लढवली आणि विजयी झालो. राजकारणात कधीही गणितं बिघडू शकतात. गणित हे भागाकार, गुणाकार, वजाबाकी होऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष कोण होईल हे प्रश्नचिन्ह आहे. माझ्याकडं मतं कमी होते तरी मी विजयी झालो. याचा महाविकास आघाडीवर कुठलाही फरक पडणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. (Bachchu Kadu’s first reaction after winning the Amravati District Bank election)

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मतं मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 मतं मिळाली. त्यामुळे 3 मतांनी बच्चू कडू विजयी झाले आहेत. शेतकऱ्यांनी चीड व्यक्त केलीय आणि त्याचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिलं की जो शेतकऱ्याचा विरोधात जाणार त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो, असंही बच्चू कडू म्हणाले.

बँकेवर सत्ता कोणाची?

अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून संपूर्ण राज्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष अमरावतीकडं लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू हे आमने सामने आले आहेत. जिल्हा बँकेत काँग्रेसची सलग 10 वर्ष सत्ता होती. ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके,राज्यमंत्री बच्चू कडूंसह इतर नेते एकत्र आले आहेत..

बच्चू कडू समर्थकांचा जल्लोष

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली, यात परिवर्तन व सहकार पॅनल होते यात राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनल कडून निवडणूक रिंगणात होते आज मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करत बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला यात बच्चू कडू विजयी होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार

विरेंद्र जगताप – चांदूर रेल्वे श्रीकांत गावंडे – धामणगाव सुरेश साबळे – तिवसा सुधाकर भारसाकडे – दर्यापूर हरिभाऊ मोहोड – भातुकली सुनील वऱ्हाडे – अमरावती दयाराम काळे- चिखलदरा प्रकाश काळबांडे – सहकारी पतसंस्था

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

बच्चू कडू – चांदूरबाजार चित्रा डहाने – मोर्शी अजय मेहकरे – अंजनगाव सूर्जी जयप्रकाश पटेल – धारणी

अपक्ष विजयी उमेदवार

अभिजित ढेपे – नांदगाव खंडेश्वर नंरेशचंद्र ठाकरे – वरुड आनंद काळे – अचलपूर

इतर बातम्या :

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन; व्यापाऱ्यांमध्ये संताप, निकष बदलण्याची मागणी

Priyanka Gandhi Arrested : आधी नजरकैद, आता अटक, प्रियांका गांधींवर UP पोलिसांकडून 36 तासांनी कारवाई

Bachchu Kadu’s first reaction after winning the Amravati District Bank election

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.