अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल
कोरोनाची लागण झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत घरीच उपचार सुरु होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी नागपूरला नेण्यात आले आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. (Amravati MP Navneet Rana who tested COVID Positive admitted to Hospital in Nagpur)
खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत घरीच उपचार सुरु होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.
नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.
आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.
हेही वाचा : आधी नवनीत राणा, आता रवी राणांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील एकूण 12 जण बाधित
सुरुवातीला रवी राणा यांच्या वडिलांनंतर मातोश्री, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण सात सदस्यांना लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाही संसर्ग झाल्याचे समजले. तर त्या पाठोपाठ आमदार रवी राणाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. राणा कुटुंबातील एकूण बारा सदस्य कोरोनाग्रस्त आहेत. या काळात अनेक दिग्गज मंडळींनी नवनीत राणा यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 11 August 2020 https://t.co/hweP9eXwzZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 11, 2020
(Amravati MP Navneet Rana who tested COVID Positive admitted to Hospital in Nagpur)