AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : पक्ष की बहीण? भाजप नेत्यासमोर द्विधा, लढत चौरंगी

मविआसमोर भाजप, अनिल बोंडेंच्या अपक्ष भगिनी संगीता शिंदेंचे आव्हान, अमरावती मतदारसंघाचा स्पेशल रिपोर्ट

अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : पक्ष की बहीण? भाजप नेत्यासमोर द्विधा, लढत चौरंगी
| Updated on: Nov 19, 2020 | 12:20 PM
Share

अमरावती : कोरोना काळातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल निवडणूक आयोगाने वाजवले आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजप उमेदवार नितीन धांडे, भाजप नेते अनिल बोंडे यांच्या अपक्ष रिंगणात उतरलेल्या बहीण संगीता शिंदे यांचे आव्हान आहे. त्यामुळे अनिल बोंडे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहतील की एकुलत्या एका बहिणीला मदत करणार, यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. (Amravati Teacher Constituency Election Candidates Special Report)

विभागात एकूण मतदान केंद्र : 77 निवडणूक रिंगणात एकूण उमेदवार : 27 अमरावती शिक्षक मतदार संघात 5 जिल्हे येतात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा

जिल्हानिहाय मतदार अमरावती : 10 हजार 88 अकोला : 6 हजार बुलडाणा : 7 हजार 422 वाशिम : 3 हजार 773 यवतमाळ : 7 हजार 407

एकूण : 34 हजार 690 मतदार

मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या श्रीकांत देशपांडे यांच्यासमोर शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शेळके यांचे आव्हान होते. श्रीकांत देशपांडे यांनी अरुण शेळकेंचा पराभव करत विजय मिळवला होता. आता शिवसेना-भाजप वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने गेल्या दहा वर्षांपासून शेखर भोयर आणि संगीता शिंदे सातत्याने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत देशपांडे यांच्याबद्दल मात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर त्यांच्या कार्यकाळात दिसून आला.

शेखर भोयर हे शिक्षक महासंघाकडून निवडणूक लढवत आहेत. शेखर भोयर हे मागील निवडणुकीत पराभूत झाले असूनही त्यांनी काम सुरुच ठेवले. एकीकडे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. तर नितीन धांडे आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने धांडेंना तिकीट दिलं. या तिघांच्या वादामध्ये माझा विजय निश्चित होईल, अशी अपेक्षा शेखर भोयर व्यक्त केली. (Amravati Teacher Constituency Election Candidates Special Report)

गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक मतदारसंघात केलेल्या कामावरुन आपला विजय निश्चित आहे. अनेक शिक्षकांच्या समस्यांचं निराकरण केलं, त्यामुळे आपला मार्ग सुकर आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

माझा भाऊ भाजपचा कार्यकर्ते आहे. ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतील पण मला लहान बहीण म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला आहे, असं मत संगीता शिंदे यांनी व्यक्त केलं.

मी पक्षासाठी काम करेन, पण भाऊ म्हणून मी तिला सुयश मिळण्यासाठी आशीर्वाद दिला आहे, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे त्यांनी यावेळी दिली. एकीकडे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आपल्या बहिणीला विजयाचा आशीर्वाद दिला तर दुसरीकडे आपण पक्षासोबत प्रामाणिक राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र प्रत्यक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात ते कोणाला मदत करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषीमंत्री गहिवरले

अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; मविआ, भाजपविरोधात भाजप नेत्याची बहीणही रिंगणात

(Amravati Teacher Constituency Election Candidates Special Report)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.