‘पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं’, राऊतांच्या वक्तव्याला बोंडेंचं प्रत्युत्तर

मलिक यांनी ट्विटरवर अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी टाकली आहे. मलिकांच्या या आरोपांना बोंडे यांनीही आता प्रत्युत्तर दिलंय. तसंच शरद पवार यांनाही बोंडे यांनी जोरदार टोला लगावलाय.

'पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं', राऊतांच्या वक्तव्याला बोंडेंचं प्रत्युत्तर
अनिल बोंडे, शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 3:38 PM

अमरावती : शहर हिंसाचार आणि तोडफोड प्रकरणावरून राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळतेय. मलिक यांनी ट्विटरवर अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी टाकली आहे. मलिकांच्या या आरोपांना बोंडे यांनीही आता प्रत्युत्तर दिलंय. तसंच शरद पवार यांनाही बोंडे यांनी जोरदार टोला लगावलाय. (Anil Bonde criticizes Sharad Pawar, Sanjay Raut and Nawab Malik)

मी कालच्या ट्विटरवर केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे. मी कधीही हर्बल तंबाखू किंवा दाऊ पिऊन बोलत नाही. नवाब मलिकसारखे बेहिशेबी बोलण्याची माझी सवय नाही, असा टोला बोंडे यांनी लगावलाय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे हात-पाय बांधलेले गृहमंत्री आहेत. त्यांना प्रत्येक गोष्ट विचारून करावी लागते. त्यामुळे त्यांचं गृह विभागावर नियंत्रण नाही, अशी टीकाही बोंडे यांनी केलीय. इतकंच नाही तर शरद पवार कधीच खोटे बोलत नाहीत असं संजय राऊत यांचं म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं म्हणणं झालं, असा जोरदार टोलाही बोंडे यांनी लगावला आहे. ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच दंगली होतात, कारण भाजप सरकार दंगल खोरांवर तातडीने कारवाई करते, असंही अनिल बोंडे म्हणाले.

अनिल बोंडेंची पवारांवर टीका

शरद पवार यांनी अमरावती आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येऊ नये. पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत माहिती नाही. त्यांनी अमरावतीमध्ये येऊच नये. त्यांना संतप्त शेतकरी आणि नागरिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. विदर्भात फिरताना त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी, अशा शब्दात अनिल बोंडे यांना पवारांच्या दौऱ्यावर टीका केलीय.

अंकुश काकडेंचं बोंडेंना प्रत्युत्तर

अनिल बोंडे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विदर्भ काय तुमच्या बापाचा आहे का? शरद पवार महाराष्ट्रात कुठेही फिरू शकतात. भाजपला राज्यातील वातावरण बिघडवायचं आहे. एका माजी मंत्र्याला असं वक्तव्य शोभा देत नाही, अशा शब्दात काकडेंनी बोंडे यांना उत्तर दिलं आहे.

इतर बातम्या :

एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ द्यायला तयार आहोत… पण; अनिल परबांनी सांगितली समस्या

दरेकर म्हणतात, दाऊद नाव केवळ मुस्लिमांचच का? मराठ्यांमध्येही आहेत, वानखेडेवर वाद वाढणार?

Anil Bonde criticizes Sharad Pawar, Sanjay Raut and Nawab Malik

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.