Amruta Fadnavis : ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!, अमृता फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ये 'भोगी', कुछ तो सीख हमारे 'योगी' से! असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय.

Amruta Fadnavis : ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!, अमृता फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं
उद्धव ठाकरे, अमृता फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 3:50 PM

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. योगी सरकारच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं अभिनंदन केलं आहे. तर महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय.

तत्पूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत योगी सरकारचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’, असं ट्वीट करत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

दरम्यान, यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिवसेना प्रर्यायानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 25 एप्रिल रोजीही अमृता फडणवीस यांनी चार ओळींमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीका केली होती. ‘कलियुग के इस राजा ने अब दिया एक फ़रमान है….जो उगलेगा ‘च’ की गाली, उसे इज़्ज़त और मान है, जो जपेगा नाम प्रभु का, उसकी हलक में जान है !’ असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘उद्ध्वस्त ठ’ असा करत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा प्रश्न केला होता. त्यात त्यांनी एकूण 6 पर्यायही दिले होते. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आलं होतं.

इतर बातम्या : 

Mamata Banerjee to PM Modi: आधी आमची देणी क्लिअर करा, एक काय 5 वर्ष पेट्रोल-डिझेलवर कर लावणार नाही; ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर

Pune Prashant Jagtap : महाविकास आघाडीचा एल्गार; पुण्यात घुमणार आवाज, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार सभा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.