अमृता फडणवीस यांचे राजकारणात येण्याचे संकेत, म्हणाल्या…
अमृता फडणवीस यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिलेत...
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिलेत. राजकारण ही पूर्णवेळ देऊन कार्य करण्याचं क्षेत्र आहे. त्यामुळे जेव्हा मी राजकारणासाठी पूर्णवेळ देऊ शकेन तेव्हाच मी राजकारणात (Politics) येईल”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.
अमृत फडणवीस यांच्याकडे सध्या कोणतंही राजकीय पद नाहीये. मात्र त्या विविध राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असतात. त्यामुळे जर अमृता फडणवीस पूर्णवेळ राजकारणात येणार असतील, तर त्यांच्या विधानांकडे सर्वांचंच लक्ष असेल.
अमृता फडणवीस या जरी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्या तरी तितकीच त्यांची ओळख नाहीये. अमृता या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तसंच त्या गायिका आणि अभिनेत्री आहेत.
अमृता या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर ट्विटरच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त करत असतात. शिवाय विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यासाठीही त्या परिचित आहेत.
अमृता फडणवीस यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. गायक शानसोबत अमृता फडणवीस यांनी ‘धडका दिल’ हे गाणं गायलं आहे.
एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये अमृता फडणवीस यांनी एक गाणं सादर केलं होतं. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा झाली.
अमृता फडणवीस यांनी शिवतांडव सादर केलं होतं. याचीही सोशल मीडियावर चर्चा झाली.