Sharad Pawar : ‘ही तर भाविकतेची सर्वोच्च पायरी’, पवारांच्या दगडूशेठ गणपतीचं मंदिरात जात दर्शन न घेण्याच्या निर्णयावर दवेंची प्रतिक्रिया

Sharad Pawar at Dagadusheth Ganpati : पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं याचा आम्हाला आनंद आहे. मांसाहार केल्यानं पवार मंदिरात गेले नाहीत ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे, असंही आनंद दवे म्हणाले.

Sharad Pawar : 'ही तर भाविकतेची सर्वोच्च पायरी', पवारांच्या दगडूशेठ गणपतीचं मंदिरात जात दर्शन न घेण्याच्या निर्णयावर दवेंची प्रतिक्रिया
शरद पवारांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 6:54 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, पवारांनी बाप्पाचं दर्शन बाहेरुनच घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चेला ऊत आलाय. मात्र, पवार यांनी मांसाहार (Non Veg) केल्यानं ते मंदिरात गेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं याचा आम्हाला आनंद आहे. मांसाहार केल्यानं पवार मंदिरात गेले नाहीत ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे, असंही आनंद दवे म्हणाले.

शरद पवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरे यांनी जे आरोप केले होते त्याला आज पवारांनी कृतीतून उत्तर दिलं. मांसाहार केल्यानं पवार मंदिरात गेले नाहीत ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे. त्यामुळे पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पवार यांनी यापूर्वीही सांगितलं होतं की मी प्रचारावेळी मंदिरात जातो. पण आज पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं त्याचा आनंद असल्याचं दवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांची भूमिका हिंदुत्ववाद्यांना आनंद देणारी – दवे

आनंद दवे यांनी शुक्रवारीही पवारांच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं. शरद पवारसाहेब पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आजपर्यंत केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार साहेब आता मंदिरात जात आहेत आणि आम्हाला ते याची देही, याची डोळा पाहायला मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी घेतलेली ही भूमिका हिंदुत्त्ववादी लोकांना, कार्यकर्त्यांना निश्चितच आनंद देणारी आहे, असे हिंदू महासंघ मानतो, असे दवे म्हणाले होते.

राज ठाकरेंचा आरोप, पवारांचं कृतीतून उत्तर

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर नास्तिकतेचा आरोप केला होता. पवार हे क्वचितच एखाद्या मंदिरात गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. तसंच शरद पवार नास्तिक आहेत असं सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्याचंही राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तरही दिलं. ‘माझा धर्म आणि देव याचं मी प्रदर्शन करत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. बारामतीत. त्याचा मी गाजावाजा करत नाही’, असा टोला पवारांनी राज यांना लगावला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.