आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत, आता थेट प्रवक्तेपदाची बक्षिसी

प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते आनंद दुबे यांनीही शिवबंधन बांधले होते. (Anand Dubey spokesperson of Shivsena)

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत, आता थेट प्रवक्तेपदाची बक्षिसी
आनंद दुबेंची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:29 AM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिवसेनेत प्रवेश केलेल्या तिघा जणांना प्रवक्तेपद देण्यात आले आहे. सचिन अहिर (Sachin Ahir), प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यासह आनंद दुबे (Anand Dubey) यांनाही प्रवक्तेपदी स्थान मिळालं आहे. (Anand Dubey who joined Shivsena from Congress is official spokesperson of Shivsena)

2019 मधील लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर, विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या पाच महिन्यांच्या काळात काँग्रेसला चांगलीच गळती लागली होती. काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते आनंद दुबे यांनीही शिवबंधन बांधले होते.

आनंद दुबेंचा 2019 मध्ये शिवसेना प्रवेश

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुबेंनीही आपल्या सर्व पदांचा त्याग केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दुबेंनी जुलै 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आनंद दुबे यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. दुबेंच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतदारांना शिवसेना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हं आहेत.

आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांना बक्षिसी

आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांची गेल्या वर्षीच प्रवक्तेपदी नियुक्ती झाली होती. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना मागे सारत त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली होती. तर आदित्य ठाकरेंना वरळीतून विधानसभेवर पाठवण्यात मोठा वाटा असलेल्या सचिन अहिर यांनाही आधीच शिवसेनेचं उपनेतेपद मिळालं होतं. त्यातच आता प्रवक्तेपदाची भर पडली आहे.

बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती

दुसरीकडे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पुनर्नियुक्तीसह सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ यांनाही प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा देण्यात आली आहे.

अरविंद सावंतांना मुख्य प्रवक्तेपद

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाल्याचं दिसत आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही. (Anand Dubey who joined Shivsena from Congress is official spokesperson of Shivsena)

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी) सुनील प्रभू – आमदार (मुंबई) प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे) भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी) अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी) मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी) किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई) शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी) डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी) किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी) संजना घाडी (नवीन वर्णी) आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)

संबंधित बातम्या :

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, संजय राऊतांसह ‘त्या’ खासदाराला मुख्य प्रवक्तेपद, 16 जण कोण?

(Anand Dubey who joined Shivsena from Congress is official spokesperson of Shivsena)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.