Pune : अन् शहाजी बापूंनी हातच जोडले..! पुण्यामध्ये नेमके असं काय घडले?

आगामी काळात शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावरच होणार. शिवाय मेळाव्याला गर्दी नाही तर जमलेले शिवसैनिक कोणत्या विचाराचे सोने लूटतात हेच महत्वाचे असल्याचे शहाजीबापू म्हणाले आहेत.

Pune : अन् शहाजी बापूंनी हातच जोडले..! पुण्यामध्ये नेमके असं काय घडले?
आ. शहाजीबापू पाटील
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 10:08 PM

रणजित जाधव Tv9 मराठी, पुणे : शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा जसा जवळ येत आहे त्याप्रमाणे बैठका आणि गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. त्याचअनुषंगाने सांगोल्याचे  (Shahaji Patil) आमदार शहाजी बापू पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. दसरा मेळावा (Dussehra Rally) तर रेकॉर्डब्रेक होणारच असा आत्मविश्वास व्यक्त करीत शहाजीबापूंनी पक्ष प्रमुखांच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्यापासून दुरावलेले हे सर्वच जवळचे होते. मात्र, त्यांनी वेळीच निर्णय न घेतल्यामुळे आता मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंदे गटात दाखल होतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आगामी काळात मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला शहाजी बापूंनी मात्र, हातच जोडले. मंत्रीपद मिळाले तरी ठीक नाही मिळाले तरी ठीक पण एक कार्यकर्ता म्हणून कायम कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. भलेही शरद पवार यांच्यावर टीका करण्याची माझी पात्रता नसली तरी, लोकशाहीमध्ये हे अधिकार सर्वांना दिले असल्याचे सांगत अजित पवारांच्या टीकेला शहाजीबापूंनी उत्तर दिले आहे.

दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी प्रयत्न करा असे कोणतेही आदेश आलेले नाहीत. एवढेच नाहीतर गर्दी जमवण्यासाठी पैशाचे वाटप होत नसल्याचे त्यांनी पांडूरंगाची शपथ घेऊन सांगितले. जनतेने एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे असे काही करण्याची गरज आम्हाला तरी नाही असेही पाटील म्हणाले आहेत.

आगामी काळात शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावरच होणार. एक नवा पायंडा यामाध्यमातून सुरु होत आहे. शिवाय मेळाव्याला गर्दी नाही तर जमलेले शिवसैनिक कोणत्या विचाराचे सोने लूटतात हेच महत्वाचे असल्याचे शहाजीबापू म्हणाले आहेत.

मंत्री मंडळातील समावेशाबद्दल विचारले असता त्यांनी मात्र हातच जोडले. मंत्री मंडळात समावेश झाला तर ठीक असे म्हणत आपणही इच्छूक असल्याचेच त्यांनी सांगितले. मंत्रीपद नाही मिळाले तरी एक शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे जे आदेश देतील तो मान्य असल्याचेही बापूंनी यावेळी सांगितले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.